घररायगडखोपोली मार्केटमध्ये लिंबाचा भाव किलोला ३०० रुपयांवर

खोपोली मार्केटमध्ये लिंबाचा भाव किलोला ३०० रुपयांवर

Subscribe

अवकाळी पावसाने यंदा महाराष्ट्रातील लिंबूचे उत्पादन घटले आहे. वाढलेली मागणी व पुरवठा मंदावल्याने लिंबाच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे.

उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना वाढत्या पार्‍याप्रमाणे लिंबाचेही भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. टोल, डिझेलनंतर लिंबानेही आता भाव खाल्ला आहे. गेल्या पंधरा दिवसांत दुपटीने भाववाढ होऊन प्रति किलो लिंबाचा भाव ३०० रुपये झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी लिंबाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. खोपोलीतील किरकोळ बाजारात एक लिंबू १० ते २० रुपयांना विकले जात आहे. मात्र ग्राहकांनी वाढलेल्या लिंबाच्या किंमतीमुळे लिंबू घेणेच बंद केले असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. तसेच काही दिवसांपूर्वी ११०० रुपयांना लिंबाची गोणी होती. आता त्या गोणीची किंमत ५५०० ते ६००० रुपये झाली असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

- Advertisement -

उन्हाळ्यात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातच पवित्र रमजान सुरू असल्याने लिंबू-सरबतासाठी लिंबाला मोठी मागणी असते. परंतु अवकाळी पावसाने यंदा महाराष्ट्रातील लिंबूचे उत्पादन घटले आहे. वाढलेली मागणी व पुरवठा मंदावल्याने लिंबाच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे.

उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लिंबू, व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत असून उन्हाळ्यात आपल्याला हायड्रेट ठेवतो. तसेच आपली पचनसंस्था सुरळीत राखण्यात मदत होते. पण, लिंबाची मागणी ज्या प्रमाणात वाढली आहे, तेवढा पुरवठा वाढलेला नाही. जवळपास प्रत्येक भाज्यांचे भाव वाढले आहेत, परंतु ते अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. एवढी महागडी भाजी घेणे मध्यमवर्गीय ग्राहकाला परवडत नाही. गेल्या वर्षी मार्चमध्ये आम्ही जी किंमत देत होतो त्यापेक्षा ही किंमत जवळजवळ दुप्पट, तिप्पट आहे, असे एका ग्राहकाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -