घररायगड‘नैना’विरोधात प्रकल्पग्रस्तांची सिडकोवर धडक

‘नैना’विरोधात प्रकल्पग्रस्तांची सिडकोवर धडक

Subscribe

नैना प्रकल्पाविरोधात गावोगावी यशस्वीपणे करण्यात आलेल्या गाव बंद आंदोलनानंतरही सरकारकडून आंदोलनाची हवी तशी दखल घेतली न गेल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सिडको कार्यालयावर वाहन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. नैना प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समिती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केलेल्या घोषणेनुसार गुरुवारी आयोजित मोर्चात दुपारच्या रख रखत्या उन्हात देखील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी वाहन घेऊन मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे देखील सिडको भावनांवरील प्रकल्प ग्रसतांच्या मोर्चात सहभागी झाले होते.

पनवेल:  नैना प्रकल्पाविरोधात गावोगावी यशस्वीपणे करण्यात आलेल्या गाव बंद आंदोलनानंतरही सरकारकडून आंदोलनाची हवी तशी दखल घेतली न गेल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सिडको कार्यालयावर वाहन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. नैना प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समिती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केलेल्या घोषणेनुसार गुरुवारी आयोजित मोर्चात दुपारच्या रख रखत्या उन्हात देखील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी वाहन घेऊन मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे देखील सिडको भावनांवरील प्रकल्प ग्रसतांच्या मोर्चात सहभागी झाले होते.
सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नैना प्रकल्प शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये असल्याने प्रकल्पग्रस्तांकडून मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहेत.गुरुवारी आयोजित वाहन मोर्चातूनही आंदोलकांचा प्रकल्प विरोधातील रोष दिसून आला तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून प्रकल्पाविरोधातील रोषही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरु करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेना (उद्धव ठाकरे)जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील,काँग्रेस पक्षाचे नेते सुदाम पाटील,शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, गोपाळ भगत, शंकर म्हात्रे, प्रमोद भगत यांच्यासहित महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप, शिवसेना ( उद्धव ठाकरे , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीतील पक्षा सोबतच दिल्ली आणि पंजाब राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय होती.

ग्रामस्थांच्या भावना पोचणार वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यत
वाहन मोर्चाने सिडको भवन येथे पोहचलेल्या आंदोलकांच्या शिष्ट मंडळाने सिडकोचे अधिकारी राजेश पाटील यांची भेट घेतली आणि आपली भूमिका अधिकार्‍यांसमोर मांडली. यावेळी पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे एकूण घेत ग्रामस्थांच्या भावना वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यत पोहचवण्याची ग्वाही दिली. मात्र नैना प्रकल्प नकोच अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतल्याने ग्रामस्थांनी सिडको अधिकार्‍यांसोबत एकत्र बैठक आयोजित करावी त्यामध्ये नैना प्रकल्पतीला फायद्याची माहिती आम्ही देऊ तसेच नैना प्रकल्पामधील अधिकारी पैसे मागत असतील तर त्या बाबत माहिती दिल्यास कारवाई करण्याची ग्वाही अधिकार्‍यांनी दिल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते सुदाम पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

काळे झेंडे
मोर्चात आपापली वाहन घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांनी आपल्या वाहणावर राजकीय पक्षांच्या झेंड्यासोबत नैना पार्कल्पा विरोधात रोष दर्शवण्यासाठी काळे झेंडे फडकवण्यात आले होते. त्याच सोबत आंदोलकांनी आपल्या वाहनांवर काळ्या पट्ट्या बांधल्याचे पहायला मिळाले तर काही आंदोलक काळ्या पेहरावातच आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅक्सी, रिक्षा, लक्झरी कार आणि दुचाकी
तालुक्यातील विविध गावांमधून सुरु झालेल्या वाहणाच्या मोर्चात मोर्चेकरी टॅक्सी, रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहन घेऊन सामील झाले होते. या वाहणानमध्ये लाखो रुपये किमतीच्या लक्झरी कार अनेकांच्या आकर्षणाच्या केंद्र स्थानी असल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक कोंडी
आंदोलनाची घोषणा अगोदरच करण्यात आलेली असल्याने या वेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असल्याचे पाहायला मिळाले. मोर्चा साठी सायन – पनवेल महामार्गा वर काही प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आल्याने महामार्गा वर काही काळ वाहतूक कोंडीचे वातावरण निर्माण झाले होते.

हे सरकार आंधळ्या बहिर्‍यांचे.
सद्या चे सरकार हे आंधळ्या बहिर्‍यांचे सरकार असून या सरकारला प्रकल्प ग्रस्तानवर होणारा अन्याय दिसत नसून, प्रकल्प ग्रस्ता कडून अन्याया विरोधात फोडला जात असलेला टाहो ऐकू जात नसल्याने वाहन मोर्चाच्या माध्यमातून या आंधळ्या बहिर्या सरकारच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्त शेतकरी करत आहे.
– बाळाराम पाटील.
माजी आमदार, शेकाप नेते

जोरदार घोषणाबाजी
रद्द करा रद्द करा, नैना प्रकल्प रद्द करा.
नैना प्रकल्पची बाजू माधणार्‍या खासदारांचा निषेध असो.
जमीन आमच्या मालकीची, नाही कोणाच्या बापाची.
देणार नाही, देणार नाही जमीन आमची देणार नाही अशा प्रकारची घोषणा बाजी केली जात होती तसेच सध्याच्या सरकार विरोधात देखील घोषणा बाजी आंदोलक करत होते.
…….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -