घररायगडपनवेल पालिकेच्या तिजोरीत 250 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा

पनवेल पालिकेच्या तिजोरीत 250 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा

Subscribe

पनवेल-: यावर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून ते ८ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत २५० कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिकेत आजवर १० महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेच्यावतीने विविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. (More than 250 crore property tax collected in the coffers of Panvel Municipality) नागरिकांचा या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचाच सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तूलनेत यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत २५० कोटीहून अधिक रूपयांची भर पडली आहे.

- Advertisement -

मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दरमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरल्यास त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. ज्या नागरिकांना अजूनही मालमत्ता कराची बिले मिळाली नाही त्यांनी महापालिकेच्या १८००५३२०३४० या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधल्यास कॉल सेंटरच्या माध्यामातून बिल घेता येणार आहे. तसेच मालमत्ता करासंदर्भातील हरकती जसे की नावामध्ये बदल, मालमत्तेचे बाह्य स्वरूपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास, स्वमालकी असताना भाडेतत्वावर कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज संबधित प्रभाग कार्यालयाकडे सादर करावेत.

घर बसल्या अ‍ॅपवरुन कर भरा                                                                                  मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या ‘PMC TAX APP’ मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे. या पमध्ये नाव बदलाकरता रिक्वेस्ट केल्यास महापालिकेकडून नाव बदलानंतर संबधितांस नोटिफिकेशन मिळणार आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने ‘PMC TAX APP’ विकसित केले आहे तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

- Advertisement -

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा                                                                                              सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा तसेच मालमत्ताकराबाबत काही शंका असल्यास त्यांनी १८००५३२०३४० या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -