घररायगडखोपोली नगरपालिकेच्या र.वा.दिघे वाचनालयास आग

खोपोली नगरपालिकेच्या र.वा.दिघे वाचनालयास आग

Subscribe

पंतपाटणकर चौकातील र.वा.दिघे वाचनालात बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीत जीर्ण रद्दी,संगणक आणि विद्युत उपकरणे जळून खाक झाली तर पुस्तके वाचविण्यात यश आले आहे.सदर आग शाँकसर्कीटमुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

      खोपोली: पंतपाटणकर चौकातील र.वा.दिघे वाचनालात बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीत जीर्ण रद्दी,संगणक आणि विद्युत उपकरणे जळून खाक झाली तर पुस्तके वाचविण्यात यश आले आहे.सदर आग शाँकसर्कीटमुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खोपोली नगरपालिकेचे सार्वजनिक र.वा.दिघे वाचनालयाची मोठी आणि भव्य इमारत पंतपाटणकर चौक शास्त्री नगर येथे आहे.वाचनालयात दैनंदिन वर्तमानपत्रे आणि हजारोच्या संख्येने पुस्तकांचा ठेवा आहे.बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास वाचनालयातील कोपऱ्यात अचनाक आगीची ठिणगी उडली आणि खाली असलेल्या जीर्ण रद्दीने पेट घतला दारे,खिडक्या बंद असल्यामुळे धुराचे लोट बघताच सदर घटना वाऱ्यासारखी पसरताच अग्निशमन दल,पोलिस यंत्रणा,अपघातग्रस्त टिमचे सदस्य घटनास्थळी पोहचले.त्यानंतर अग्निशमन दल,अपघातग्रस्त टिमच्या सदस्यांनी वाचनालयात प्रवेश करून दारे खिडक्या उघडल्या त्यानंतर पाण्याचा मारा केल्यामुळे आग आटोक्यात आली.आगीत जीर्ण रद्दी,संगणक आणि विद्युत उपकरणे जळून खाक झाली.पुस्तकांसाठी खुप अंतर ठेवत मांडण्या असल्यामुळे 90 टक्के पुस्तके वाचविण्यात यश आले आहे.
मोठी ग्रंथ संपदा अग्नी प्रलयापासून बचावली
 र.वा.दिघे वाचनालयात लागलेली आग विझविण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेडचे फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी संपूर्ण टीम, पोलीस उपनिरीक्षक अलोक खिस्मतराव,पोलीस स्टेशनचा स्टाफ,अपघातग्रस्त टिमचे गुरुनाथ साठेलकर, गौरव शिंदे,मनोज माने, ऋतूराज भोपतराव यांची मोलाची मदत केली. वेळेवर मदत पोचल्याने मोठी ग्रंथ संपदा अग्नी प्रलयापासून बचावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -