घररायगडRaigad News : जिल्हा रुग्णालयाची OPD वर्षभर हाऊसफुल; लाखो रुग्णांनी घेतला लाभ

Raigad News : जिल्हा रुग्णालयाची OPD वर्षभर हाऊसफुल; लाखो रुग्णांनी घेतला लाभ

Subscribe

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रायगडसह शेजारील जिल्ह्यातील रुग्ण या रुग्णालयाला पसंती देत आहेत.

अलिबाग : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत तब्बल 1 लाख 27 हजार 390 रुग्णांनी बाह्य रुग्ण तपासणीचा लाभ घेतल्याची माहिती रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल घुगे जोशी यांनी दिली. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे शहर असून या रुग्णालयात रुग्णांची कायम वर्दळ असते.

हेही वाचा… Raigad News : रायगडमधील २७ पाणथळ जागांना ‘दस्तावेज’ सुरक्षा

- Advertisement -

जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र बाह्य रुग्ण विभागात दिवसाला सरासरी 350 ते 360 रुग्ण तपासणीसाठी येत असतात. 15 जुलै 2023 पासून जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, आरोग्य सेवक, रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी अधिक सक्षमतेने काम करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा… Khopoli News : वन खात्याच्या परवानगीनंतरही रस्ता जैसे थे! ताकई ग्रामस्थ आक्रमक

- Advertisement -

वेगवेगळ्या अत्याधुनिक साहित्य सामग्रीच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली गेल्यामुळे कोणत्या रुग्णाला कोणता आजार हे तपासण्यासाठी प्रत्येक वॉर्डात आणि विभागात सोय केलेली आहे. रुग्णालयात सध्या प्रत्येक रुग्णावर योग्य असे उपचार केले जात आहे. अतिशय अवघड आणि महागड्या शस्त्रक्रिया या विभागात योग्यरित्या पार पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्ण नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयावर विश्वास निर्माण झाला आहे.

बाह्य रुग्ण विभागात शून्य ते 12 वयोगटातील 13 हजार 812 रुग्णांनी लाभ घेतला, तर 13 ते 18 वयोगटातील 7 हजार 48 रुग्णांनी लाभ घेतला. 19 ते 59 वयोगटातील 84 हजार 707, तर 60 वर्षांवरील 21 हजार 823 रुग्णांनी लाभ घेतला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. शीतल घुगे जोशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिश्रा, बालरोग तज्ज्ञ डॉ. सागर खेदू आदींसह सर्व विभागप्रमुख व आरोग्यसेवक या ठिकाणी अतिशय उत्तम सेवा देता आहेत. त्यामुळे केवळ रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातील रुग्णदेखील रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राधान्य देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -