घररायगडकेंद्र शासनाच्या अंत्योदय मोहिमेत रायगड जिल्हा, २८ एप्रिल ते २६ जून कालावधीत...

केंद्र शासनाच्या अंत्योदय मोहिमेत रायगड जिल्हा, २८ एप्रिल ते २६ जून कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन

Subscribe

अंत्योदय मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला बचत गट, स्थानिक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, स्वातंत्र्य सैनिक, युवा गट, महाविदयालयीन विद्यार्थी, शेतकरी गट, मच्छीमार संस्था व सोसायटी यांचे सहकार्य घ्यावे तसेच तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, तालुका समन्वयक यांच्या समन्वयाने राबविणेत यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त देशभरात केंद्र शासनाच्या वतीने अंत्योदय मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत केंद्र शासनाकडून रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात २८ एप्रिल ते २६ जून कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

अंत्योदय मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला बचत गट, स्थानिक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, स्वातंत्र्य सैनिक, युवा गट, महाविदयालयीन विद्यार्थी, शेतकरी गट, मच्छीमार संस्था व सोसायटी यांचे सहकार्य घ्यावे तसेच तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, तालुका समन्वयक यांच्या समन्वयाने राबविणेत यावी. या संदर्भात जिल्हातील युवा संस्था, शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने कला पथक, प्रभात फेरी, ग्रामसभा, विविध जयंती दिनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुंटुंबियांचा सत्कार इत्यादी उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचे फोटो तसेच माहितीचे संकलन तालुका स्तरावर करण्यात यावे. सदर मोहिमेचा शुभारंभ १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात यावा. तसेच सदर मोहीम कालावधीत प्रत्येक महीन्यात किमान १ विशेष ग्रामसभेचे आयोजन करून त्यामध्ये या मोहीमेची व मोहीमे अंतर्गत घेतलेल्या कामांची सविस्तर माहिती देऊन जनजागृती करावी. त्याचबरोबर मोहीम कालावधीत ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक पंधरवडयास विशेष शिबिराचे आयोजन करून विविध योजनांची कृती संगमाद्वारे अमंलबजावणी करावी. यासंदर्भात आयोजीत केलेल्या कामाचे फोटो, वृत्तपत्रातील बातमी, चित्रफित इत्यादी माहिती जिल्हा समन्वय तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांना पाठविण्यात यावी. तसेच सदर माहिती ही http://akamantyodaya.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी केल्या आहेत.

वैयक्तिक लाभाचे उपक्रम
– आधार नोंदणी ,पॅनकार्ड नोंदणी, प्रधानमंत्री जनधन खाते उघडणे
– गरजू शेतकर्‍यांना किसान क्रेडीड कार्ड उपलब्ध करून देणे
– मजूरांचे ई-श्रमकार्ड काढून नोंदणी करणे
– प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना लाभार्थीची नोंदणी करणे
– दिव्यांगाना वैश्वीक ओळखपत्र उपलब्ध करून देणेसाठी नोंदणी करणे
– प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत लाभार्थीची नोंदणी व दुरूस्ती करणे
– नवीन महिला बचत गट स्थापन करणे
– मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड नोंदणी, जॉब कार्ड नूतनीकरण करणे व वैयक्तीक लाभ प्रदान करणे

- Advertisement -

आरोग्य विषयक उपक्रम
– महिला व बालकांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे
– सॅम बालकांचा शोध घेऊन त्यांना अतिरिक्त आहार पुरवणे व पोषण आहार कार्यक्रमाची माहिती देणे
– प्रधानमंत्री मातृ वंदन योजना व जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करून नोंदणी करणे
– हर घर दस्तक योजने अंतर्गत सर्व नागरीकांचे लसीकरण पुर्ण करणे
– आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करणे

सामूहीक अन्य उपक्रम
– सर्व अपूर्ण घरकूले व शौचालय पुर्ण करणे
– गावातील गायी व म्हशींचे लाळ खुरकत रोगाचे लसीकरण करणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -