घररायगडजिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू राहणार

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू राहणार

Subscribe

कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात सोमवारपासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने, तसेच आस्थापना संपूर्ण आठवडाभर दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक बाबींशी निगडीत नसलेली दुकाने, तसेच आस्थापना पूर्णपणे बंद राहतील.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने शासनाने राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करून निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. जिल्ह्याचा रुग्ण वाढीचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे रायगडचा समावेश चौथ्या स्तरात आहे. मॉल, चित्रपटगृह, नाट्यागृह पूर्णपणे बंद राहणार आहेत. उपहार गृहांमधून पार्सल आणि घरपोच सेवा देता येईल. सार्वजनिक ठिकाणी आणि मोकळ्या जागेत सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत चालणे आणि सायकलिंग करणे, तसेच बाह्य मैदानी खेळास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर काही अटींच्या आधीन राहून दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील. सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असेल. लग्न समारंभासाठी 25 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. अंत्याविधी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडेल. कृषी विषयक वस्तूंची, तसेच सेवांची दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -