HomeरायगडRaigad Farming News : उन्हाळी शेती कशी करायची, रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल

Raigad Farming News : उन्हाळी शेती कशी करायची, रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल

Subscribe

पनवेल : रोहा तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. जानेवारीचा पहिला आठवडा उलटला तरी कोलाड पाटबंधारे विभागाने पाणी सोडलेले नाही. त्यामुळे दुबार म्हणजेच उन्हाळी भातशेती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडले आहेत. कोलाड पाटबंधारे विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनेक ठिकाणी कामे पूर्ण न झाल्याने कालव्यांची खरोखर दुरस्ती केली का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्याचवेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि तिथले आमदार शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालतील का, असाही सवाल विचारला जात आहे.

कोलाड पाटबंधारे विभागाने अनेक ठिकाणी कालव्याची दुरुस्ती केली आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी केलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत, असा आरोप होत आहे. शिवाय नको तेथे मोऱ्या बांधणे, काँक्रिटीकरणासाठी पैशांची नाहक उधळपट्टी केल्याचाही आरोप पाटबंधारे विभागावर होत आहेत. कारण एवढे करूनही कामे पूर्ण न झाल्यामुळे रोहा तालुक्यातील तळवली, नडवली, धानकान्हे, चिल्हे, देवकान्हे ते मालसई निडी अष्टमीपर्यंत तसेच आंबेवाडी संभेपाले किल्ला, धाटाव लांढर ते निवी या भागातील शेतकऱ्यांसमोर पाण्याअभावी उन्हाळी शेती कशी करायची, असा भला मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

हेही वाचा…  Fish Producton : कोकणातील मासे कुणी खाल्ले, मत्स्य उत्पादनात महाघट

पूर्वी कुंडलिकेच्या सिंचनातून उजवा तीर व डावा तीरलगत असलेल्या शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळायचे. त्यामुळे उन्हाळी शेतीतून चांगले उत्पादन घ्यायचे. 2011-12 मध्ये सरकारी धोरण म्हणून हे कालवे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आले. आता दीड दशक झाले तरी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नक्की काय सुरू आहे, असा सवाल शेतकरी करत आहेत.

हेही वाचा…  HMPV in India : भारतात एचएमपीव्हीचे तीन रुग्ण आढळले, अनेक राज्यांत अलर्ट जारी

कुंडलिकेच्या उजव्या तिरामधून पुई गोवे गावाच्या भातशेतीला पाणी सोडण्यात येतो. गेल्यावर्षी पाणी उशिरा सोडण्यात आले. परिणामी भातपिक जूनमध्ये तयार झाले. पिक चांगले येऊनही जोरदार पावसामुळे ते कुजून गेले. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे पाणी सोडण्यात येणार नसल्यास शेतकऱ्यांना अगोदर कळवावे, म्हणजे त्यांचे नुकसान होणार नाही. – लीलाधर दहिंबेकर, शेतकरी, कोलाड

(Edited by Avinash Chandane)