HomeरायगडRaigad News : मच्छीविक्रेत्या महिलांना शीतपेट्यांचे वाटप, आरसीएफ कंपनीचा उपक्रम

Raigad News : मच्छीविक्रेत्या महिलांना शीतपेट्यांचे वाटप, आरसीएफ कंपनीचा उपक्रम

Subscribe

अलिबाग : सामाजिक दायित्वाची जाण ठेवत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सने (आरसीएफ, थळ) परिसरातील मच्छीमार, मच्छीविक्रेत्या महिलांना शीतपेट्यांचे वाटप केले आहे. कंपनीने सीएसआर निधीतून हा उपक्रम राबवला आहे. कारखान्यालगतच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे आणि महाव्यवस्थापक संजीव हरळीकर यांच्या हस्ते एक हजार शीतपेट्या महिलांना सन्मानपूर्वक देण्यात आल्या.

थळ कारखाना परिसरातील थळ मच्छीमार सहकारी सोसायटी लि आणि नवेदार नवगाव बोरेश्वर सर्वोदय सहकारी सोसायटी लि. यांच्याकडून कंपनीकडे विनंती आली होती. मच्छीविक्रेत्या एक हजार महिलांना शीतपेट्यांची आवश्यकता आरसीएफ कंपनीने त्यांच्या सीएसआर निधीतून त्या द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत मासे व्यवसायासाठी पुरक अशा एक हजार शीतपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या. मच्छीविक्रेत्या अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असतात. अशावेळी मासे ताजे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी शीतपेटी खूप महत्त्वाची असते. ही जाणीव ठेवूनच कंपनीने शीतपेट्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा…  Raigad News : मराठी द्वेषाची लाट पेणमध्ये, परप्रांतीय भाजीवालीचा मराठीवर राग

महिला सक्षमीकरणासाठी आरसीएफ सकारात्मक असून तशी भूमिका पार पाडत आहे. या शीतपेट्यांमुळे महिला मच्छीमारांच्या, मच्छीविक्रेत्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडेल आणि त्याचा आत्मविश्वास वाढून ते व्यवसाय मोठा करून कुटुंब चालवू शकतील, असे प्रतिपादन कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांनी यावेळी केले. तर आजच्या परिस्थितीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचे महत्त्व स्पष्ट करून सीएसआरच्या माध्यमातून कारखाना परिसरात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही महाव्यवस्थापक संजीव हरळीकर यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा…  Raigad Politics : पालकमंत्रीपदासाठी रायगडमध्ये बॅनरबाजी, एक फिक्स पालकमंत्री, दुसरा भावी पालकमंत्री

या कार्यक्रमाला उपमहाव्यवस्थापक (मानव संपदा प्रशासन) विनायक पाटील, उपमहाव्यवस्थापक (ईटीपी) उदय चव्हाण, मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक महेश पाटील, कॉर्पोरेट सीएसआर सल्लागार धनंजय खामकर, वरिष्ठ व्यवस्थापक सीएसआर हर्षला शिंदे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी (थळ) संतोष वझे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी (थळ) राकेश कवळे यांसह मच्छीमार सोसायट्यांचे पदाधिकारी आणि लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -