HomeरायगडRaigad News : बेकायदा मासेमारीवर ड्रोनची नजर, पहिल्या ड्रोन प्रणालीचे उड्डाण

Raigad News : बेकायदा मासेमारीवर ड्रोनची नजर, पहिल्या ड्रोन प्रणालीचे उड्डाण

Subscribe

अलिबाग : अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन गुरुवारी मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. त्याचवेळी अलिबागजवळ वरसोली बीचवर जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते ड्रोन प्रणालीला हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन करण्यात आले. याशिवाय श्रीवर्धन तालुक्यातील मूळगाव जेट्टीवरून ड्रोन प्रणालीचे उड्डाण करण्यात आले. कोस्टगार्ड विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अलिबागमधील मत्स्य सहकारी संस्थांचे, संघाचे प्रतिनिधी, नौकामालक त्यावेळी उपस्थित होते.

राज्यातील बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन सुधारित कायदा अंमलात आणला आहे. कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गस्ती नौकांकडून कारवाई केली जाते. गस्ती नौकांना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य नसते. तसेच बेकायदा नौकांचा पाठलाग करत असताना त्या पळून जात असतात. अशा नौकांना पकडणे कठीण असते. म्हणूनच रायगडसह कोकणातील 7 जिल्ह्यांत अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेवण्यात येणार आहे. यामुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होईल आणि त्यांच्यावर सागरी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करणे सोपे होईल.

हेही वाचा…  Raigad News : वीर यशवंतराव घाडगे यांच्या शौर्यांचे माणगावकरांना स्मरण, दुसऱ्या महायुद्धातील अतुलनीय पराक्रम

ड्रोनच्या वापराने मासेमारी नौकांचे मॅपिंग केल्यावर बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांची माहिती विभागास सहज उपलब्ध होईल. ड्रोनद्वारे किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार आहे. त्यामुळे हे ड्रोन सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येतील. परिणामी सागरी सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा…  Pen Balganga : 14 वर्षांनंतरही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा वनवास सुरूच, मुख्यमंत्री फडणवीस आश्वासनाची पूर्तता कधी करणार

रेवदंडा तसेच श्रीवर्धनमधील सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध असून मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू करण्यात आले आहे.

(Edited by Avinash Chandane)