अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग साखरजवळ 15 खलाशी असलेली मच्छीमार बोट बुडाली आहे. सुदैवाने सगळे खलाशी वाचले आहेत. बोटीत अचानक पाणी भरल्याने ही बोट हळूहळू बुडू लागल्यानंतर सर्व खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यामुळे ते वाचले. मासेमारीसाठी ही बोट समुद्रात गेली होती. बोटीमध्ये अचानक बिघाड झाल्याने गळती लागली आणि बोट बुडू लागली. या दुर्घटनेचे साक्षीदार असलेले जनार्दन नाखवा यांनी ही माहिती दिली. बुडालेल्या बोटीला दुसऱ्या बोटीने समुद्र किनाऱ्यावर खेचत साखर किनाऱ्यावर आणण्यात आले. बोटीमधील सर्व सामान खराब झाले असून बोट मालकाचे आणि खलाशांचे मिळून अंदाजे 12 लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती नाखवा यांनी दिली. उशिरापर्यंत बोटीतील पाणी पंपाने काढण्याचे काम सुरू होते. गेल्या महिन्यात गेटवे ऑफ इंडियाहून घारापुरीला जाणारी प्रवासी बोट नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेने फुटून 15 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा… Mahad Morcha : महाडकरांचा मूक मोर्चा कशासाठी, महाडमध्ये अचानक काय घडलं
(Edited by Avinash Chandane)