HomeरायगडRaigad News : महाड एमआयडीसीमध्ये पुन्हा दुर्घटना, कंपनीच्या स्फोटात 9 जखमी

Raigad News : महाड एमआयडीसीमध्ये पुन्हा दुर्घटना, कंपनीच्या स्फोटात 9 जखमी

Subscribe

अलिबाग : रायगडमधील महाड एमआयडीसीमधील कारखाने आणि कामगार सुरक्षित आहेत का, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. गुरुवारी एका कंपनीत झालेल्या स्फोटात 9 कामगार जखमी झाले आहेत. यामुळे एमआयडीसीमधील कंपन्यांच्या दुर्घटनांचा आणि कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर सर्व कामगारांना गुरुवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला.

महाड एमआयडीसीमधील ॲस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीत गुरुवारी (19 डिसेंबर) दुपारी स्फोट झाला. यात रितेश रामदास निंबरे (19, कोटेश्वरी तळे महाड), वसंत दगडू जंगम (43, बिरवाडी, महाड), आर्यन राजीव रॉय (20, चांभारखिंड, महाड), दिनेश गणपत म्हसळकर (21, गोरेगाव, माणगाव), प्रशांत गोविंद चाचले (22, धारवली, पोलादपूर), प्रथमेश दत्ताराम मुसळकर (23, गोरेगाव, माणगाव), रामचंद्र, गुलाबचंद आणि तेजस निंबरे असे 9 जण जखमी झाल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात, लग्नाच्या वऱ्हाडातील काही ठार, अनेक जखमी

याबाबत पोलिसांनी कंपनी प्रशासनाच्या 9 प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

कंपनीचा बनाव?

ॲस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या कारखान्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रिअॅक्टरचा स्फोट झाला. त्यात एक कामगार किरकोळ जखमी झाला होता. यावेळी कंपनी प्रशासनाकडून रंगीत तालीम असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, त्याचा आवाज तीन किलोमीटरपर्यंत पसरला. या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यावेळी ही रंगीत तालीम नसून दुर्घटना असल्याचे स्पष्ट झाले.

या अधिकाऱ्यांवर गुन्हे

स्फोटाच्या तीव्रतेने प्लांटचे पत्रे आणि लोखंडी तुकडे लागून कामगार जखमी झाले. या घटनेची पोलिसांनी माहिती घेतली असता येथील कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे दिली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी प्लांटचे मुख्य निरंजन अविनाश बर्डे, सुरक्षा अधिकारी ऋषिकेश प्रकाश भोज, शिफ्ट अधिकारी संकेत गोविंद मोरे, एचआर व्यवस्थापक गौरी जितेंद्र तेलंगे, सुरक्षा परवानगी देणारे अधिकारी अनिल केशव देसाई, प्लांट मुख्य अधिकारी अनंत अशोक मुळे, अभिजीत थरवळ, योगेश देशमुख, रहातेकर या 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -