Maharashtra Assembly Election 2024
घररायगडRaigad News : निवडणुकीआधी जिल्हाधिकाऱ्यांनी कुणाला शुभेच्छा दिल्या, रायगडवासीयांना कोणते आवाहन केले

Raigad News : निवडणुकीआधी जिल्हाधिकाऱ्यांनी कुणाला शुभेच्छा दिल्या, रायगडवासीयांना कोणते आवाहन केले

Subscribe

पनवेल : लोकशाहीचा पाया आणि उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची संपूर्ण तयारी झाली असून मतदारांनी तणावमुक्त वातावरणात मतदान करावे यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे रायगडमधील मतदारांनी निर्भय होऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. त्याचवेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निवडणुकीसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मतदानाची वेळ

बुधवारी (२० नोव्हेंबर) सकाळी ७ सायंकाळी ६ या वेळेत मतदान करायचे आहे.

- Advertisement -

मतदार आणि मतदार केंद्र

रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, कर्जत-खालापूर, अलिबाग-मुरुड, श्रीवर्धन आणि महाड-पोलादपूर असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण २४ लाख ८८ हजार ७८८ मतदार असून मतदानासाठी एकूण २ हजार ८२० मतदार केंद्र निर्माण करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मतदारांना मदत

कुठे मतदान करायचे, मतदान केंद्र कोणते आहे ही माहिती मतदारांना सहज मिळावी यासाठी निवडणूक आयोगाचे https://electoralsearch.eci.gov.in/ हे संकेतस्थळ विकसित केले आहे. एपिक नंबर किंवा मोबाईल नंबर नमूद केल्यास सर्व माहिती मिळते.

दिव्यांगांसाठी सुविधा

रायगड जिल्ह्यातील ७ मतदारसंघात १३ हजार १९१ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदानासाठी व्हीलचेअर तसेच वाहनाची प्रत्येक मतदान केद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

तक्रारींचे काय?

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणूक आयोगाने सी-व्हिजील ( C-VIGIL) अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातून एकूण ५० तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी ४५ तक्रारी खऱ्या होत्या. ५० पैकी ४५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर ५ चुकीच्या पध्दतीने केलेल्या तक्रारी रद्द करण्यात आल्या. तसेच टोल फ्री क्रमांक १९५० वर आलेल्या सर्व ६९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

मतदारांसाठी वाहतूक व्यवस्था

विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी ३४६ एसटी बस, १२४ मिनी बस, २९१ जीप अशा एकूण ७६१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे.

गृहमतदान

रायगड जिल्ह्यात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या २ हजार ६८० मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

कारवाई

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपर्यंत एकूण २७ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल आणि रोख जप्त करण्यात आली आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -