HomeरायगडRaigad News : मराठी द्वेषाची लाट पेणमध्ये, परप्रांतीय भाजीवालीचा मराठीवर राग

Raigad News : मराठी द्वेषाची लाट पेणमध्ये, परप्रांतीय भाजीवालीचा मराठीवर राग

Subscribe

पनवेल : मराठीचा द्वेष करत मराठी माणसाला वाट्टेल ते बोलणाऱ्या पेणमधील यूपीतील महिला भाजीविक्रेत्याचा माज पेणकरांनी उतरवला आहे. मात्र, परप्रातीयांची मुजोरी महाराष्ट्रातील शहरे, गाव-खेड्यात किती वाढली आहे, हे यावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे मराठीजनांमध्ये संतापाची लाट आणि त्यावेळी चिंताही वाढली आहे.

पेणमधील पोटे मार्गावर भाजी विक्रेत्याकडे एक दामप्त्य टोमॅटो घेण्यासाठी गेले होते. तेव्हा ती भाजीविक्रेती महिला हिंदीत बोलली. हे पाहून दांपत्याने तिला मराठी बोलण्यास सांगितले. त्यावर ‘मैं मराठी नही बोलुंगी, तुम हिंदी में बोलो’, असे म्हणत तिने तिचा मराठी द्वेष दाखवून दिला. एवढेच नाही तर ‘इन लोगों को यूपीवाले नही चलते तो पाप धोने बनारस क्यू जाते हो, असे म्हणत तिने ‘अगर तुम में दम हैं तो यूपी में जाकर कमाओ खाओ’ अशी भाषा तिने वापरली. या महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पेणमध्ये संतापाची लाट उसळली. ही महिला नेहमीच ग्राहकांनी हुज्जत घालत असते आणि मराठीचा द्वेष करते, असे येथील ग्राहकांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा…  Kalyan Crime : कल्याणमधील परप्रांतीय सुधरेना, आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण

पेणमधील पोटे मार्गावर ही महिला अनधिकृत व्यवसाय करते. अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तिला जाब विचारला आणि पोलिसांकडे तक्रार केली. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर या महिलेची बोबडी वळली. त्यानंतर ‘मी मराठीचा द्वेष करणार नाही, मला माफ करा’ असे म्हणत या महिलेने पोलीस ठाण्यात माफीनामा लिहून दिला. मात्र, अनेक वर्षांपासून ती पेणमध्ये राहून आणि पेणमध्ये अनधिकृत व्यवसाय करून मराठी भाषेविरुद्ध आग ओकत होती, त्याचे काय असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Marathi vs Marwadi Conflict : मारवाडीत बोलण्यासाठी महिलेला दमदाटी; मनसेकडून दुकानदाराला चोप

या प्रकरणानंतर तिचा अनधिकृत व्यवसाय बंद करण्यात आला आहे. आता तिचे फणस डोंगरीमधील घर अधिकृत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबांवर हल्ल्याच्या दोन घटना ताज्या असताना आणि डाबर कंपनीत एका परप्रांतीयांकडून मराठी कर्मचाऱ्यांवर दादागिरीचे प्रकरण ताजे असताना पेणमध्येही परप्रांतीयांकडून अरेरावीचे प्रकरण समोर आल्याने मराठी समाजात संतापाची लाट पसरली आहे.

कोण आहे ही मराठीद्वेष्टी महिला

या महिलेचे नाव अंती अजय विश्वकर्मा (३६) असून ती पेणमधील फणस डोंगरी येते २००६ पासून राहते. कायम मराठी माणसासोबत अरेरावीची भाषा करत ती पोटे मार्गावर अनधिकृत व्यवसाय करते.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -