पनवेल : घरात गॅस दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक भडका उडाला. यात घरातील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नागोठण्यातील खडकआळी येथे रविवारी (8 डिसेंबर) रात्री घडली. जखमींवर सुरुवातीला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यातील दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एकाला अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
विलास विठू जोशी यांच्या खडकआळी येथील घरात योगेश ठमके हे गॅस दुरुस्तीचे काम करत होते. तेव्हा अचानक गॅस लीक झाला कुणाला काही कळण्याच्या आत आगीचा भडका उडाला. यात विलास जोशी (45), दिनेश म्हाप्रळकर (17) आणि गॅस दुरुस्त करणारे योगेश ठमके हे तिघे गंभीर जखमी झाले. योगेश यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
हेही वाचा… Shocking survey : सरकारी कार्यालयांना लाच देणाऱ्या व्यावसायिकांची टक्केवारी आली समोर
या आगीत जोशी यांच्या घरातील सामान तसेच मंडप डेकोरेशनचे साहित्य खाक झाले. त्यांचे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या दुर्घटनेची नागोठणे पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबर दया पाटील या तपास करत आहेत.
(Edited by Avinash Chandane)