घररायगडरायगड क्षयरोग मुक्तीच्या वाटेवर; मृत्यू दर ४ टक्क्यावर 

रायगड क्षयरोग मुक्तीच्या वाटेवर; मृत्यू दर ४ टक्क्यावर 

Subscribe

जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम राज्यात प्रथम १९९८ पासून सुरु करण्यात आला आहे. आज रायगड जिल्हा क्षयरोग मुक्तीच्या वाटेवर आहे. रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा , आशा , अंगणवाडी सेविका , आरोग्यसेवक तळागाळात जाऊन क्षयरोग निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. २०२२ मध्ये आरोग्य यंत्रणेने ५७ हजार ८४४ संशयित रुग्णांची क्षय रोग तपासणी केली.

अलिबाग: जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम राज्यात प्रथम १९९८ पासून सुरु करण्यात आला आहे. आज रायगड जिल्हा क्षयरोग मुक्तीच्या वाटेवर आहे. रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा , आशा , अंगणवाडी सेविका , आरोग्यसेवक तळागाळात जाऊन क्षयरोग निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. २०२२ मध्ये आरोग्य यंत्रणेने ५७ हजार ८४४ संशयित रुग्णांची क्षय रोग तपासणी केली. यामध्ये ४८७५ क्षय रोगाचे निदान झालेले रुग्ण सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात खसयरोगासाने मृत्यू होण्याचे प्रमाण ७ टक्क्यावरून ४ टक्क्यांवर आला आहे. क्षयरुग्ण आढळल्यानंतर तातडीने त्याच्यावर केले जाणारे उपचार यामुळेच मृत्युदर कमी झालं असून रायगड जिल्ह्यातील क्षय रोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील यांनी सांगितले.
९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केलेला आहे. सदर अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यात ५५८ क्षयरुग्ण ६५ निक्षयमित्राद्वारे दत्तक घेण्यांत आले असून सदर क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार पुढील ६ महिन्यांसाठी किंवा सदर रुग्ण उपचाराखाली असे पर्यंत देण्यांत येणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने क्षयरोग विरुध्दाच्या लढ्यात, नवीन कल्पनेतून सर्व क्षयरुग्णांना शोधणे व त्याला संपूर्ण उपचार देऊन त्यांना बरे करुन आपल्या पुढील पिढीसाठी क्षयमुक्त वातावरण निर्माण करण्याची शपथ रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. असे डॉ. वंदनकुमार पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण भागात एकुण ६२ सुक्ष्मदर्शी केंद्र
जिल्ह्यात शासनाच्यावतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दर १ लाख लोकसंख्येमध्ये १ सुक्ष्मदर्शक केंद्र स्थापन करुन तज्ञ व प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञाव्दारे क्षयरोग निदानाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुकास्तरावरुन ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण तपासणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आदिवासी भागात याहूनही कमी लोकसंख्येच्या प्रमाणात रोगनिदान केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अशा प्रकारे रायगड ग्रामीण भागात एकुण ६२ सुक्ष्मदर्शी केंद्राव्दारे क्षयरोग निदानाच्या सेवा सर्व उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रातून जनतेसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात २०२२ मध्ये ५७ हजार ८४४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली . यामध्ये एकुण ४८७५ क्षय रुग्ण शोधण्यात आले आहेत.रोगनिदान झालेले सर्व रुग्णांना त्यांच्या राहत्या गावी उपचाराखाली ठेवण्यात आलेले आहेत. डॉट्स उपचार पध्दतीने क्षयरोगामुळे होणारे मृत्युचे प्रमाण कमी झालेले आहे, तसेच रुग्णांचे क्षयरुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण सुध्दा कमी झालेले आहे. रायगड जिल्ह्यात क्षयरोगाने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण ४ टक्के इतके आहे.
– डॉ. वंदनकुमार पाटील,
जिल्हा क्षयरोग अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -