HomeरायगडRaigad News : 7 दिवसांत 5 हजार 128 गुन्हे आणि 45 लाखांचा...

Raigad News : 7 दिवसांत 5 हजार 128 गुन्हे आणि 45 लाखांचा दंड, रायगड पोलिसांचा बेशिस्तांना इंगा

Subscribe

अलिबाग : रायगड पोलिसांनी जास्त सक्रिय होत बेशिस्त वाहतूकदारांना इंगा दाखवण्यास सुरुवात केली आहे. वाहतुकीच्या नियमांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या वाहनचालकांना रायगड पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. पोलिसांनी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 7 दिवसात 5 हजार 128 बेशिस्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय त्यांना 45 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 82 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी धसका घेतला आहे.

थर्टी फर्स्टला (31 डिसेंबर) मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला होता. तरीही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आणि 82 जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी 18 ठिकाणी ब्रेथ अॅनलायझर मशीन उपलब्ध केली होती. यात महाड विभागातील 24, पेण विभागात 15, अलिबाग विभागात 10, खालापूर विभागात 11, रोहा विभागात 9, माणगाव विभागात 6, कर्जत विभागातील 3 आणि श्रीवर्धन विभागातील 3 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा…  Uran News : उरणमधील वायु वीज प्रकल्प व्हेन्टिलेटरवर, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका

रायगड पोलिसांनी नाताळपासून (25 डिसेंबर 2024) सात दिवस व्यापक कारवाई करत 5 हजार 128 जणांवर वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यात सीटबेल्टशिवाय वाहन चालवणारे 823 चालक, दुचाकीवरून तिघे स्वार होणाऱ्या 162 जणांचा तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 196 जणांचा समावेश आहे. या सर्वांना एकूण 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे रायगडमधील वाहनचालकांना शिस्त लागेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

हेही वाचा…  Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानक महिलांसाठी असुरक्षित? भरदिवसा माथेफिरूने कापले तरुणीचे केस

मद्यपी चालकांमुळे अपघात होऊन जीवित तसेच वित्तहानी होऊ शकते. शिवाय वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवून शकतात. तसेच कारवाई होत नाही, असे अनेकांचा भ्रम असतो. तो भ्रम तोडण्यासाठी रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

(Edited by Avinash Chandane)