Maharashtra Assembly Election 2024
घरराजकारणRaigad Politics : पेणमध्ये कार्यकर्त्यांकडून लोकसभेसाठी धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी

Raigad Politics : पेणमध्ये कार्यकर्त्यांकडून लोकसभेसाठी धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी

Subscribe

रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. कोणताही भ्रष्टाचार आरोप नसलेला आणि राज्य विधिमंडळात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावणारे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे भाजपा वरिष्ठ नेतृत्वाला विचार करण्यास भाग पाडले एवडे मात्र खरे.

पेण: पेण विधानसभा मतदारसंघामधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हजर होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून रायगड लोकसभेचा उमेदवार म्हणून भाजपचे रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील हेच उमेदवार द्या अशी घोषणाबाजी केली. रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. कोणताही भ्रष्टाचार आरोप नसलेला आणि राज्य विधिमंडळात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावणारे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे भाजपा वरिष्ठ नेतृत्वाला विचार करण्यास भाग पाडले एवडे मात्र खरे. (Raigad Politics In Pen activists announced the name of Darisheel Patil for Lok Sabha)

या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार रवी पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पनवेलमधील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील, पेण विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य कौशल्या पाटील, जि.प. सदस्य डी.बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, महेश मोहिते, रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : BMC Budget 2024 : महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी 508 कोटींची तरतूद

केंद्रात 2014 मध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदार संघात प्रशांत ठाकूर यांनी कमळ फुलवीले. तर २०१९ मध्ये पेण विधानसभा मतदारसंघात आमदार रवी पाटील यांनी विजय संपादन केला. आता तर 2024 मध्ये सब कुछ भाजपा अशा प्रकारे चार विधानसभा पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य असल्याने आणि मोदी सरकारने राबविलेल्या जनहिताच्या योजनांमुळे रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपच्या कमळ चिन्हावर धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे असा निर्धार उपस्थित नेते व कार्यकर्ते यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा : Thackeray On Rane : कोंबडी चोर, लायकी, डबडी अन बरंच काही; राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडली

आमदार प्रशांत ठाकूर यावेळी बोलत होते की, रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रितपणाने ही जागा जिंकून मोदींचे हात बळकट करुया, अबकी बार चारशे पार ही भाजपची घोषणा साध्य करु या असे म्हटले तर माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, पेणचे दोन राजकीय नेते एकत्र भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी असल्याने पेणची ताकद वाढली आहे. मी एक वर्षापूर्वी जाहीर पक्षप्रवेश केला त्यामुळे राजकीय विरोध संपून पेण भाजपमय झाला. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे काम माझ्यासह सहा आमदारनी केले. त्यांची त्यावेळी ताकद होती पण आता राजकीय संदर्भ बदलेत आज त्यांच्या सोबत यापैकी कुणीही नाहीत. भाजपची ताकद त्याच्यापेक्षा मोठी आहे. ही सर्व परिस्थिती भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळीकडे मांडावी अशी अपेक्षा करतो. याशिवाय भाजपचे अतुल काळसेकर आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी मोदी सरकारने राबविलेल्या योजना बाबत मार्गदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -