Maharashtra Assembly Election 2024
घररायगडRaigad Politics : शेकापसोबत हातमिळवणी करणारे तटकरे गद्दार, महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याने...

Raigad Politics : शेकापसोबत हातमिळवणी करणारे तटकरे गद्दार, महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याने संघर्ष चिघळला

Subscribe

पनवेल : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून (2019) सुरू झालेला शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणुअगोदरपासून कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वादाच्या फैरी झडत होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही त्यांच्यातील वाद संपले नाहीत तर उलट वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी अदिती तटकरे यांना मंत्रिपद देऊ नका, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. एवढेच नाही तर शपथविधीनंतर रायगडमधील तिन्ही आमदार त्यांना एकत्रित विरोध करणार असल्याचे वक्तव्य केल्यामुळे आता रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…  Raigad Politics : रायगडमध्ये पुन्हा रंगले कुरघोडीचे राजकारण, काठावर वाचलेल्यांना असं महेंद्र थोरवेंना का म्हणाल्या अदिती तटकरे

- Advertisement -

कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष थांबता थांबत नाही. विधानसभा निकालानंतर थोरवे यांनी पाच दिवसांत दुसऱ्यांदा सुनील तटकरे यांना डिवचले आहे. सुनील तटकरे यांनी महायुतीत राहून महायुतीशी प्रतारणा करत गद्दारी केल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी महाडमध्येही गद्दारी करण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. हे कमी म्हणून की काय, तटकरे यांनी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केल्याचाही दावा थोरवे यांनी करून रायगडमधील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघात रोह्याचा जो भाग येतो त्यासाठी सुनील तटकरे यांनी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली होती. अलिबाग मतदारसंघातून जयंत पाटील यांच्या स्नुषा चित्रलेखा पाटील निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांना मदत करतो, असे तटकरे यांनी सांगितले. त्याबदल्यात तुम्ही तुमची कर्जतमधील शेकापची मते अपक्ष उमेदवाराला द्या, अशी सेटलमेंट करण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

- Advertisement -

शपथविधीनंतर काय होणार?

दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर रायगडमधील तिन्ही आमदार सुनील तटकरेंना विरोध करणार आहोत, असेही थोरवे यांनी स्पष्ट केले. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. अलिबागमधून महेंद्र दळवी आणि महाडमधून भरत गोगावेल यांचा यात समावेश आहे. 2019 मध्ये पालकमंत्रिपदावरून गोगावेले आणि तटकरे यांच्यात झालेला संघर्ष जगजाहीर आहे. अखेर महायुतीचे सरकार आल्यावर या वादाला पूर्णविराम देण्यासाठी अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांना बाजूला ठेवत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्रिपद दिले होते.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -