Maharashtra Assembly Election 2024
घररायगडAssembly Election : विजयाचा चौकार मारण्यासाठी प्रशांत ठाकूर सज्ज, विकासकामांची साथ अन्...

Assembly Election : विजयाचा चौकार मारण्यासाठी प्रशांत ठाकूर सज्ज, विकासकामांची साथ अन् समाजकार्याची पुण्याई सोबत

Subscribe

पनवेल : भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाला गती दिली. सोबतच पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र झटले आहेत. याच विकासकामांच्या आणि सामाजिक कार्याच्या जोरावर प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभा मतदारसंघातून विजयाच्या चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कायम सढळ हाताने मदत करत समाजकार्याला महत्त्व दिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांना आदराची भावना आहे. त्यांचा हा समाजकारणाचा वारसा प्रशांत ठाकूर यांनी चालवला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, तसेच कला, क्रीडा आदी सर्व क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर उल्लेखनीय काम केले. त्यामुळे पनवेल मतदारसंघातील प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज, क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.

हेही वाचा…  Prashant Thakur : कोरोना काळात प्रशांत ठाकूर यांनीच मदत म्हणून पाठिंबा, सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख यांनी जागवल्या कोरोना काळातील आठवणी

- Advertisement -

पनवेलच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेला पाठपुरावा तसेच अनेक विकासकामांमुळे प्रशांत ठाकूर यांची बाजू मजबूत झाली आहे. त्याचवेळी त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने शेकापकडून बाळाराम पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लीना गरड उभ्या आहेत. बाळाराम पाटील यांनी अनेकदा पत्रकार परिषदेत विकास केल्याचा दावा केला. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सातत्याने शेकापची सत्ता राहिली आणि ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले. तरीही 20 वर्षांपासून पनवेल पंचायत समितीची इमारत पूर्ण करता आली नाही. जिल्हा परिषद शाळेची घटती पटसंख्या रोखण्यात त्यांना कोणतीही उपाययोजना करता आली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, मूलभूत सुविधा देता आल्या नाहीत.

कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याचे पैसे आपण मिळवून दिले अशा वल्गना पाटील यांनी सतत केल्या. मात्र हे पैसे मिळवून देण्यासाठी मागणी, पत्रव्यवहार, पाठपुरावा, आंदोलन मोर्चे कुठे काढली याची माहिती आजपर्यंत देता आली नाही. शिक्षक आमदार होऊनही शिक्षकांचेही प्रश्न सोडवले नाहीत, असा आरोप केला जात आहे. ते शिक्षक आमदार असताना मविआची अडीच वर्षे सत्ता होती. त्यावेळीही त्यांनी पनवेलच्या विकासासाठी तसूभरही काम केले नाही, अशी टीका केली जात आहे. दरम्यान, मालमत्ता कर भरू नका, असे लीना गरड लोकांना सांगतात. मग त्यांनी स्वतःचा मालमत्ता कर का भरला? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. प्रशांत ठाकूर यांच्या विरोधातील बाळाराम पाटील आणि लीना गरड यांच्या जाहीरनाम्यात एकही आश्वासक मुद्दा नसल्याचाही दावा केला जात आहे.

- Advertisement -

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -