Maharashtra Assembly Election 2024
घररायगडRaigad Politics : सुधाकर घारे गरजले तर नितीन सावंत यांचा संयम, कर्जत...

Raigad Politics : सुधाकर घारे गरजले तर नितीन सावंत यांचा संयम, कर्जत मतदारसंघात चाललंय तरी काय

Subscribe

कर्जत / खोपोली : विधानसभा निवडणूक संपली, निकाल लागले, आता सरकार स्थापन होणार आहे. असं असलं तरी रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातील महाभारत संपण्याचं नाव घेत नाही. कर्जतमधून शिवसेना महायुतीचे महेंद्र थोरवे आणि अपक्ष सुधाकर परशुराम घारे यांच्यात अटीतटीची लढत झाली. थोरवे जिंकले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन सावंत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशातच सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधून इशारे दिले आहेत.

सुधाकर घारे यांनी बुधवारी (27 नोव्हेंबर) कर्जतमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संकल्प सभा घेत नवा हुंकार भरला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर आगामी सर्व निवडणुकांमध्ये मी सर्वांसोबत असून त्यांनी विरोधक महेंद्र थोरवे यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. त्याचवेळी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा थेट इशाराही त्यांनी दिला. या सभेला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर खोपोलीत ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनीही संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन खोपोलीत शिवसैनिकांना केले. त्यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा…  Raigad Politics : रायगडमध्ये पुन्हा रंगले कुरघोडीचे राजकारण, काठावर वाचलेल्यांना असं महेंद्र थोरवेंना का म्हणाल्या अदिती तटकरे

- Advertisement -

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत यांनी बुधवारी (27 नोव्हेंबर) खोपोलीतील मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत सर्वांना धीर दिला आणि पुन्हा काम करण्याची उभारी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचा आपण निष्ठावंत मावळा असून पराभवाने खचून जाणार नाही, असे ठणकावून सांगतानाच पुढील काळात संघर्ष करायची तयारी ठेवली असून तुम्हीही तयारी ठेवा, असे आवाहन केले. तसेच लवकरच कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीचा मेळावा घेऊन संवाद साधू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इकडे कर्जतमधील संकल्प सभेत घारे यांनी महेंद्र थोरात यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. जे 20 फेऱ्यांपर्यंत घरी बसून होते. त्यांना अखेरीस जनतेने कौल देत विजयी केले. मात्र विजयी झाल्यावर जनतेला नम्रपणे हात जोडून पुढे जाण्याऐवजी दंड थोपटून दाखवत होते. जनतेचा मान ठेवण्याऐवजी पुढची पाच वर्ष तुम्हाला दाखवून देईल, अशी यांची कृतीतून भाषा होती, अशी टीका सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर केली. यावेळी ज्येष्ठ नेते भरत भगत यांनी निवडणूक प्रशासन यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बूथ क्रमांक 217 चे मशीन खराब झाले होते तर व्हिव्हिपॅटमधील चिठ्या मोजण्याची गरज होती. मात्र 1014 मते ग्राह्य धरलीच नाहीत, याकडे लक्ष वेधले. यामुळे तेथील नागरिकांचा मतदानाचा अधिकार मारला गेला, असे सांगितले.

नितीन सावंत यांनी पराभूत झाल्यानंतर खचून न जाता 24 नोव्हेंबर रोजी दिंड्यांचे कर्जतमधील शिवालय कार्यालयात स्वागत करत सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बुधवारी खालापूर तालुक्यासह शहर आणि खोपोली शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत नितीन सावंत यांनी चेहऱ्यावर पराभवाचे सावट न दाखवता कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. त्यांचे स्मितहास्य पाहून कार्यकर्त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, गजानन पाडगे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, खोपोली शहरप्रमुख संतोष देशमुख, खालापूर शहरप्रमुख संभाजी पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर, नितीन मोरे, पंढरीनाथ राऊत, नितेश पाटील, मंगेश पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका अनिता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

कर्जतमधील सुधाकर घारे यांच्या मंचावर ज्येष्ठ नेते अशोक भोपतराव, भगवान भोईर, भरत भगत, उत्तम जाधव, भगवान चंचे, संतोष बैलमारे, राजेंद्र निगुडकर, महिला आघाडीच्या रंजना धुळे, सुरेखा खेडकर, युवा नेतृत्व अंकित साखरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -