HomeरायगडRaigad Tourist : काशीद समुद्रकिनारी आणखी एका पर्यटकाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी दुर्घटना

Raigad Tourist : काशीद समुद्रकिनारी आणखी एका पर्यटकाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी दुर्घटना

Subscribe

मुरुड : नवीन वर्षाचे स्वागत करतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक मुरुड आणि काशीद समुद्रकिनारी आले होते. त्यातील एका पर्यटकाचा काशीद समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला आहे. काशीद समुद्रकिनाऱ्यावरील आठवड्यातील ही दुसरी दुर्घटना असल्यामुळे बीचवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि पर्यटकांनी घ्यायच्या काळजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी (31 डिसेंबर) साडेतीन वाजता पुण्यातून आलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाला. यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण काही काळ शोकाकूल झाले होते.

पुण्यातील जैनवाडी जनता वसाहतील प्रतीक सहस्रबुद्धे (31) त्याच्या मित्रांसोबत थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड-काशीदमध्ये आला होता. दुपारी साडेतीन वाजता ते सर्व समुद्रात पोहत होते. त्यात प्रतीकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. हे चौघेही पुण्यातून रिक्षा घेऊन आले होते. प्रतीकसोबत गणेश नितीन सहस्रबुद्धे, रिक्षाचालक शदाब अविद मलीक आणि राकेश राजू पवार हे मित्र होते. चौघेही समुद्रात पोहत होते. पोहल्यानंतर स्पोर्ट्स बाईकवर फिरण्याचा त्यांचा बेत होता. त्यासाठी गाडीतून पैसे आणण्यासाठी ते पाण्याबाहेर आले. त्यावेळी प्रतिक सहस्रबुद्धे पाण्याबाहेर आला असेल असे तिघांना वाटले.

- Advertisement -

हेही वाचा…Lucknow Crime : नववर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हादरले, हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या  

दीड तासानंतर प्रतीकचा मृतदेह पाण्यात तरंगताना लाईफ गार्डने पाहिला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने प्रतीकचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी ताबडतोब त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रतीककडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने तिन्ही मित्र शोकाकूल झाले तर प्रतीकच्या घरी ही घटना कळवल्यावर त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला. मुरुडचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख आणि हवालदार हरि मेंगाळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा तपास हवालदार हरी मेंगाळ करत आहेत.मित्रपरिवाराला डोंगर सहन करावा लागला आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Robbery : 1 कोटी 41 लाखांच्या हिर्‍यांसह कारागिराला अटक; चोरीनंतर मुंबईतून सुरत, मध्यप्रदेश, राजस्थानात पलायन

27 डिसेंबरची दुर्घटना

आठवडाभरात पुण्याच्या दुसऱ्या पर्यटकाचा काशीद समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूलमधील 11 जण काशीद समुद्रकिनारी आले होते. यात शिक्षक आणि मुख्याध्यापकदेखील होते. हे सर्व समुद्रात पोहत असताना मुख्याध्यापक धर्मेंद्र देशमुख (56) यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते खोल पाण्यात खेचले गेले. त्यानंतर ते बराच वेळ पाण्याखाली राहिले. ते न दिसल्याने त्यांचा शोध सुरू झाला. अखेर जीवरक्षकांची मदत घेतल्यानंतर जीवरक्षकांनी त्यांना शोधून पाण्याबाहेर काढले आणि तातडीने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे ते मृत झाल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत दुसऱ्या पर्यटकाचा काशीद बीचवर मृत्यू झाला.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -