घरराजकारणRatnagiri-Sindhudurg Constituency : किरण सामंत यांची माघार; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Ratnagiri-Sindhudurg Constituency : किरण सामंत यांची माघार; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रातील इतर काही जागांप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग यासह शिवसेनेने लढविलेल्या सर्व जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली होती. त्यातच उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण रवींद्र सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यांनी माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली, मात्र त्यांनी आता आपली पोस्ट डिलीट केली आहे. (Ratnagiri Sindhudurg Constituency Withdrawal of Kiran Samant The post went viral on social media)

हेही वाचा – IPL 2024 RCB vs LSG : लखनऊच्या मयांक यादवने वेगवान चेंडू टाकत स्वतःचाच मोडला विक्रम

- Advertisement -

उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. “मी… मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कौन?” असे स्टेटस त्यांनी सोशल मीडियाच्या प्रोफाइलवर ठेवल्याने या चर्चेला खतपाणी मिळाले. मात्र त्यांनी मध्यरात्री 12 च्या सुमारास स्वतःच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅपवर त्यांच्या ट्विटरवरच्या पोस्टची लिंक काही ग्रुपवर शेअर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब की 400 पार होण्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र आता त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली आहे. मात्र त्यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

- Advertisement -

किरण सामंत यांचा रत्नागिरी सिंधुदुर्गात मोठा दबदबा आहे. साधारणतः वर्षभरापासून किरण सामंत यांनाच आगामी लोकसभेसाठी उमेदवारी मिळेल, याच अपेक्षेनं सर्व समर्थक कामाला लागले होते. त्यामुळे निडणुकीत उमेदवारी जाहीर होताना महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता किरण सामंत यांनी माघार घेतल्याची माहिती समोर येत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – VBA : सकाळी पक्ष प्रवेश संध्याकाळी उमेदवारी; वंचितकडून अफसर खान देणार इम्तियाज जलील यांना टक्कर

नारायण राणे आजपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या दौऱ्यावर (Narayan Rane on a tour of Ratnagiri-Sindhudurg constituency from today)

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळाला पाहिजे अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून तिकीट दिले जाईल, असे आश्वासन भाजपाने दिल्याचे बोलले जाते, मात्र अद्यापही या जागेवरील उमेदवार घोषित झालेला नाही. असे असतानाही नारायण राणे आजपासून मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता किरण सामंत यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते नाराणय राणे यांचे कसे स्वागत करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -