घररायगडपोलादपुरात महावितरणकडून वसुलीचा फंडा; थकबाकी भरण्याचे फर्मान

पोलादपुरात महावितरणकडून वसुलीचा फंडा; थकबाकी भरण्याचे फर्मान

Subscribe

पोलादपूर तालुक्यातील वीज प्रवाह नियमितपणे सुरळीत ठेवण्यात कसूर करणार्‍या येथील महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाचे कर्मचारी आता घरोघरी जात वीज थकबाकीच्या नावाखाली वसुली करत असल्याने ग्राहकांकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी वीज मीटरग्राहकांच्या घराचे दार ठोठावत असून ग्राहकाला थकबाकी भरण्याचे फर्मान सोडत आहेत.

पोलादपूर: तालुक्यातील वीज प्रवाह नियमितपणे सुरळीत ठेवण्यात कसूर करणार्‍या येथील महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाचे कर्मचारी आता घरोघरी जात वीज थकबाकीच्या नावाखाली वसुली करत असल्याने ग्राहकांकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी वीज मीटरग्राहकांच्या घराचे दार ठोठावत असून ग्राहकाला थकबाकी भरण्याचे फर्मान सोडत आहेत. एक दोघेजण वीज ग्राहकांच्या येत असून ते वीज कर्मचारी असल्याचे सांगतात. त्यांच्या हाती कोर्‍या कागदावर हाताने लिहलेली नावांची यादी असून ‘तुमची थकबाकी असून ती भरावी लागेल, अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल’, अशी सक्त सूचना देत आहेत. मात्र आधीच वातावरणाचा पारा चढल्याने दिवसा आणि रात्रीही उकाड्याने जनता त्रस्त असताना वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत असल्याने थकबाकीसाठी ग्राहकांच्या घरी वीज कर्मचारी आल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे.

वयस्कर माणसे घरात
तालुक्यात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे गावागावातील तरुण नोकरी व्यवसाय निमित शहरात आहेत. त्यामुळे घारत वयस्क माणसे मोठ्या प्रमाणावर गावात आहेत.अशा उकाड्याने अर्धमेल्या स्थितीत दिवस कसाबसा ढकलणार्‍या वृद्धांच्या घरचे वीज कनेक्शन तोडल्यास त्यांचे काय होईल?, याचा विचारही करवत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

थकबाकी वसूली थांबवण्याची मागणी
वीज पुरवठा नियमित न करणार्‍या वीज अधिकार्‍यांंची ही कृती अयोग्य असून थकबाकी वसूली थांबवावी अशी मागणी थकबाकीदार असलेल्या ग्राहकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही वीज मीटर ग्राहक मयत झाले आहेत, त्यांच्या घरी थकबाकीची मागणी होत असल्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी असून कोणी थकबाकी दिली तर त्याबाबत पावती दिली जात नाही असेही घडत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -