घररायगडअलिबाग येथून लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरु करण्यास नकार 

अलिबाग येथून लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरु करण्यास नकार 

Subscribe

पर्यटन स्थळ असल्याने अलिबाग येथे मराठवाडा, विदर्भातून येणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त आहे; मात्र येथील आगारातून सुटणार्‍या शेगाव, तुळजापूर, गाणगापुर, संभाजीनगर या सारख्या लांब पल्ल्याच्या एसटीच्या फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. गाड्या आहेत, मात्र वाहक-चालक नसल्याने या फेर्‍या बंद करण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळावर ओढावली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेकवेळा मागणी करुनही या फेर्‍या सुरु होत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, लांब पल्ल्याच्या ज्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

अलिबाग: पर्यटन स्थळ असल्याने अलिबाग येथे मराठवाडा, विदर्भातून येणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त आहे; मात्र येथील आगारातून सुटणार्‍या शेगाव, तुळजापूर, गाणगापुर, संभाजीनगर या सारख्या लांब पल्ल्याच्या एसटीच्या फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. गाड्या आहेत, मात्र वाहक-चालक नसल्याने या फेर्‍या बंद करण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळावर ओढावली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेकवेळा मागणी करुनही या फेर्‍या सुरु होत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, लांब पल्ल्याच्या ज्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असतानाही दुसर्‍या जिल्ह्यातून येणार्‍या एसटी गाड्यांची संख्या खूपच कमी आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या अलिबाग एसटी आगरातून सुटत नसल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत असल्याचा विषय मनसेचे तालुका संघटक अमित कंटक यांनी लावून धरला आहे. पूर्वी ज्या एसटी बस फेर्‍या नफ्यात चालत होत्या त्या कोरोना कालावधीत बंद झाल्या. प्रवाशांच्या आग्रहाखातर यातील काही फेर्‍या पुन्हा सुरु झाल्या होत्या; मात्र त्यानंतर एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे ज्या फेर्‍या बंद झाल्या त्या आजपर्यंत सुरु झालेल्या नाहीत. आमच्याकडे कर्मचारी नसल्याचे कारण एसटी महामंडळाकडून दिले जाते. लांब पल्यासाठी कर्मचारी जाण्यास तयार नसतात, त्यामुळे या फेर्‍या बंद ठेवाव्या लागत असल्याचे उत्तर रामवाडी येथील विभागीय कार्यालयातून देण्यात येत आहे.

रात्र काढावी लागते पनवेल बसस्थानकात
मराठवाडा, विदर्भातून अलिबाग येथे येण्यासाठी एकही थेट फेरी नाही. पुण्याला यायचे आणि तेथून पनवेल, पनवेल येथून अलिबाग असा गाड्या बदलत प्रवास करावा लागतो. यातच बसेसची कनेक्टीव्हीटी नसल्याने प्रवाशांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जात आहे. वयोवृद्ध व्यक्तींना प्रवास नकोसा वाटतो. अलिबाग येथे नोकरी निमित्ताने आलेल्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. पनवेल येथून रात्री १० वाजल्यानंतर अनेकवेळा एसटी बस नसते. मुंबई-मुरुड ही अलिबाग येथे येणारी शेवटची बस रेवदंडा पुलाच्या कामामुळे रोहेमार्गे येत असल्याने पनवेल ते अलिबाग या मार्गावर पहाटे ५ वाजेपर्यंत एकही बस नाही. यामुळे अनेकांना रात्र पनवेल बसस्थानकातच काढावी लागते. याचा गांभिर्याने विचार करुन अलिबाग आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अमित कंटक यांनी केली आहे.

- Advertisement -

ज्या नव्या गाड्या जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत त्या गाड्या विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मार्गावर चालवल्या जात आहेत. बसेस आहेत, परंतु कर्मचारीच नाहीत. लांब पल्ल्याच्या फेर्‍यांसाठी चार कर्मचारी लागतात. या फेर्‍यासाठी हे कर्मचारी इच्छुक नसतात, त्यामुळे लांबपल्ल्याच्या फेर्‍या सुरु न करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
– दीपक गोडे,
विभागीय नियंत्रक, रामवाडी-पेण

बंद असलेल्या फेर्‍या
* अलिबाग – शेगाव (रातराणी); अलिबाग – तुळजापूर; अलिबाग – गाणगापूर; अलिबाग – गोंदवले; मुरुड – लातुर; मुरुड – छत्रपती संभाजी नगर; सासवणे – बोरीवली; आग्राव – बोरीवली; रेवस – मुंबई; रेवदंडा – कल्याण; सांबरी- मुंबई; सांबरी – परळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -