घररायगडउरणचे रस्ते अवाढव्य, पण वाहन पार्कींगमुळे अपघाताचा धोका

उरणचे रस्ते अवाढव्य, पण वाहन पार्कींगमुळे अपघाताचा धोका

Subscribe

जेएनपीटीच्या अवजड वाहनांखाली चिरडून मागील काही वर्षात या भागातील हजारो तरूणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जेएनपीटीचे रस्ते प्रशस्त करावेत आणि नागरीकांना वाहतूकीसाठी सर्व्हीस रोड बनवावेत अशी मागणी येथिल नागरीकांकडून आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत होती.

जेएनपीटीने जवळ जवळ ३ हजार कोटी रूपये खर्च करून जेएनपीटीशी संलग्न असणारे रस्ते सुसज्ज आणि रूंद बनविले आहेत. मात्र बेशिस्त वाहनांच्या पार्कींगमुळे अपघाताचा धोका कायम आहे. त्यामुळे नितिन गडकरी यांनी उरण परिसरात केलेल्या रस्त्यांच्या विकास कामांवर पाणी फेरण्याचे काम येथील वाहतूक पोलिस करत आहेत. वाहतूक पोलिसांच्या आशिर्वादानेच सर्वसामान्य नागरीकांच्या सोयीसाठी बनविलेल्या सर्व्हीस रोडवर अवजड वाहनांनी बस्तान मांडले आहे.

जेएनपीटीच्या अवजड वाहनांखाली चिरडून मागील काही वर्षात या भागातील हजारो तरूणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जेएनपीटीचे रस्ते प्रशस्त करावेत आणि नागरीकांना वाहतूकीसाठी सर्व्हीस रोड बनवावेत अशी मागणी येथिल नागरीकांकडून आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जेएनपीटी कडून जवळ जवळ ३ हजार कोटी रूपये या रस्त्यांच्या प्रशस्तीकरणासाठी मंजूर करून घेतले आणि २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रस्त्यांची कोनशिला बसविली होती. नुकतेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्यांचे उदघाटन करण्यात आले.

- Advertisement -

या रस्त्यांमध्ये जेएनपीटी ते पळस्पे आणि जेएनपीटी ते बेलापूर किल्ला या दोन मुख्य रस्त्यांचे रूंदीकरण करून या मार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गव्हाणफाटा आणि करळ फाटा येथे दोन सुंदर असे इंटरचेंज फ्लायओव्हर पुल बनविण्यात आले. आणि सर्व सामान्य नागरीकांना नागरी वाहतूकीसाठी आणि हलक्या वाहनांसाठी या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सर्व्हीस रोड बनविण्यात आले आहेत. जेणेकरून या तालुक्यातील नागरीकांना अवजड वाहनांचा आणि वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये म्हणून हे सर्व्हीस रोड बनविण्यात आले आहेत. मात्र सध्या या सर्व्हीस रोडवर या परिसरातील कंटेनर यार्ड वाल्यांनी कब्जा केला असून या सर्व्हीस रोडवर दोन्ही बाजूला अनधिकृतपणे कंटेनर ट्रेलर उभे करून ठेवले असल्याचे पहायला मिळतात.

या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या कंटेनर यार्ड आणि सीएफएस वाल्यांना आपल्या कंपनीच्या आवारात या अवजड वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था केली नसल्यामुळे ही वाहने सरळ या सर्व्हीस रोडवर उभी केली जातात. एनएच २४८ या महामार्गावर द्रोणागिरी नोड पासून ते चिर्ले टोलनाका पर्यंत तर जेडब्लू आर परिसरातील सर्व्हीस रोडवर ही अवजड वाहने मोठ्या प्रमाणात उभी केलेली असतात. त्यामुळे याचा त्रास नागरीकांना होतो. एनएच ३४८ ए या महामार्गावर देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे सर्व्हीस रोड नक्की कोणासाठी बनविले आहेत हा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे.

- Advertisement -

वाहतूक पोलिसांकडून कारवाई नाही
वाहतूक पोलिसांच्या आशिर्वादानेच ही अवजड वाहने या सर्व्हीस रोडवर उभी केलेली असतात. वाहतूक पोलिसांची खास माणसे या मार्गांवर वसूली करण्यासाठी नेमलेली असतात त्यामुळे बिनधास्तपणे ही वाहने नागरी रस्त्यांवर ठाण मांडून बसत असल्याचे चित्र उरणमधील रस्त्यांवर दिसते.वाहतूक पोलिस एखादा विना हेल्मेट दुचाकीस्वार दिसला की त्यांना लगेच दंड ठोठावतात मात्र वाहतूकीला अडथळा करणार्‍या या वाहनांवर ते कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नितिन गडकरी यांनी उरण तालुक्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणलेल्या या रस्ते विकासांवर येथिल पोलिस आणि स्थानिक प्रशासन पाणी फेरत आहे. त्यामुळे नितिन गडकरी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी उरणमधील नागरीक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -