घररायगडपेणमध्ये स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा, ५६ लाख लुटले

पेणमध्ये स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा, ५६ लाख लुटले

Subscribe

धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्यामुळे बँक अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर या एटीएमला बँक अधिकार्‍यांनी साधा सीसीटीव्ही कॅमेराही लावला नव्हता. तसेच रात्रीच्या वेळी एटीएमवर सुरक्षा रक्षकही नेमला नव्हता. नेमका याच गोष्टीचा दरोडेखोरांनी फायदा घेतला.

पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर सोमवारी पहाटे दरोडा टाकून दरोडेखोरांनी ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरून पलायन केले. दरोड्याची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्यामुळे बँक अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर या एटीएमला बँक अधिकार्‍यांनी साधा सीसीटीव्ही कॅमेराही लावला नव्हता. तसेच रात्रीच्या वेळी एटीएमवर सुरक्षा रक्षकही नेमला नव्हता. नेमका याच गोष्टीचा दरोडेखोरांनी फायदा घेतला. दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. त्यानंतर त्यांनी गॅस कटर व सिलिंडर एटीएममध्येच टाकून पलायन केले.

- Advertisement -

पेण शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील महिन्यात तरणखोप येथे एका घरात लाखो रुपयांची चोरी झाली होती. तसेच पेण शहरातील मुख्य मार्गावरील आठ दुकाने चोरांनी एका रात्रीत फोडली होती. पेण शहरात एका मागोमाग एक अशा अनेक चोरीच्या घटना होत असल्याने चोरांनी पेण पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -