Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर रायगड खालापूरभोवती कोरोनाचा पुन्हा विळखा

खालापूरभोवती कोरोनाचा पुन्हा विळखा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तालुक्यात 14 दिवसात 194 रुग्ण सापडले असून, 3 जणांचा बळी गेल्याने तालुक्याभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तालुक्यात 14 दिवसात 194 रुग्ण सापडले असून, 3 जणांचा बळी गेल्याने तालुक्याभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊननंतरही कोरोना झपाट्याने पसरला होता. रायगड जिल्ह्यात पनवेल, अलिबागनंतर खालापूर तालुका रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या आकडेवारीत तिसर्‍या क्रमांकावर होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 125 बळी घेतल्यानंतर ऑक्टोबर 2020 नंतर कोरोना संसर्गाला ब्रेक लागला होता. दररोज सापडणारे कोरोना रुग्ण एक आकडी झाल्याने नागरिक बिनधास्त असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाची दुसरी लाट तालुक्यात जाणवत असून 17 ते 30 मार्च या कालावधीत 194 रुग्ण सापडले आहेत.

सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीच्या ठिकाण जाणे टाळावे. तसेच विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आवश्यक खबरदारी घेतल्यास संसर्ग आटोक्यात येईल.
– ईरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

- Advertisement -

सुदैवाने मृत्यूदर कमी असला तरी 3 बळी अवघ्या 14 दिवसात गेल्याने चिंता अधिक वाढली आहे. तालुका पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होत असून, जिल्ह्यात तिसर्‍या क्रमांकाचा कोरोनाबाधित तालुका आहे. त्यातच गांभिर्याची बाब म्हणजे एकही कोविड केंद्र सुरू नसल्याने रुग्णांची धावाधाव सुरू झाली आहे. रुग्ण वाढीचा वेग असाच राहिला तर पुन्हा उपचारासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण येणार असून, प्रशासनाने पुढचे संकट ओळखून आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्याची गरज आहे.

मास्क, सामाजिक अंतराचे पालन आणि सॅनिटायझरचा वापर या सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. खालापुरात सध्या कोविड केंद्र सुरू नसले तरी लोधीवलीच्या अंबानी रुग्णालयात 8 बेड राखीव आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहता कर्जत उप जिल्हा रूग्णालय आणि खोपोली येथे कोविड केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. प्रसाद रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, खालापूर

- Advertisement -

30 मार्चपर्यंत खालापूर तालुक्यातील कोरोना आकडेवारी..
* एकूण कोरोनाबाधित रुग्ण -3321
* बरे झालेले रुग्ण -3024
* एकूण मृत -128

हेही वाचा –

Covid-19च्या रडारवर लहान मुले! ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण

- Advertisement -