Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर रायगड रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे सरपंच विराजमान

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे सरपंच विराजमान

रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच बुधवारी विराजमान झाले असून, गावाचा प्रशासकीय गाडा आता खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे. या पदांची निवड होताच पाठीराख्यांनी एकच जयघोष करीत फटकाक्यांची आतषबाजी केली.

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच बुधवारी विराजमान झाले असून, गावाचा प्रशासकीय गाडा आता खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे. या पदांची निवड होताच पाठीराख्यांनी एकच जयघोष करीत फटकाक्यांची आतषबाजी केली आणि मिठाई वाटली. गेल्या १७ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. माणगाव तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे विद्यमान विभागप्रमुख रवींद्र टेंबे, तर उपसरपंचपदी प्रमोद करकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षाचे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपसभापती महेंद्र तेटगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणेरेप्रमाणे टेमपाले, देवळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पक्षाचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले. टेमपाले सरपंचपदी संजिदा दाखवे आणि उपसरपंचपदी गणेश शिगवण, तर देवळी ग्रामपंचायत सरपंचपदी विनेश डवले आणि उपसरपंचपदी रजनी सुतार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर गोरेगाव जिल्हा परिषद गणाच्या सदस्या अमृता हरवंडकर, उपसभापती तेटगुरे, माजी सभापती राजेश पानवकर आणि इतरांनी सरपंच उपसरपंचांचे अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील प्रतिष्ठेच्या आपटा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेकापच्या निकिता भोईर, तर उपसरपंचपदी शिवसेनेचे वृषभ धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या नागोठणे विभागातील पळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परीक्षा घासे (चंदने) आणि उपसरपंचपदी चंद्रकांत भालेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर श्रीमंत समजल्या जाणार्‍या ऐनघर ग्रामपंचायती शिवसेनेच्या सदस्य कलावती कोकळे यांची सरपंचपदी, मनोहर सुटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. कोंडगाव सरपंचपदी कमल बुरूमकर आणि उपसरपंचपदी अनंत वाघ यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीत सर्व सदस्य शेकापक्षाचे निवडून आले आहेत. वरवठणे ग्रामपंचायतीच्या सरपंचदी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीच्या ऋतुजा म्हात्रे (शिवसेना), तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे विजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisement -

श्रीवर्धन तालुक्यातील प्रतिष्ठेच्या दिघी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे विपुल गोरिवले, उपसरपंचपदी त्याच पक्षाचे गोपाळ मेंदाडकर विराजमान झाले. तर कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आरती राणे आणि उपसरपंचपदी सचिन राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोल्हारे सरपंचपदी महेश विरले (शिवसेना), उपसरपंचपदी अस्मिता विरले, तर भिवपुरी सरपंचपदी संगीता माळी (शिवसेना) आणि उपसरपंचपदी हरिश्चंद्र मिसाळ विराजमान झाले. हुमगाव सरपंचपदी सुनील बागडे (शिवसेना), कडाव सरपंचपदी अशोक पवार (शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी), तर उपसरपंचपदी हर्षद भोपतराव यांची निवड झाली. जिते सरपंचपदी रेणुका मिरकुटे (शिवसेना), उपसरपंचपदी तुकाराम भोईर, साळोख सरपंचपदी मनीषा शिनारे (शेकाप-शिवसेना युती) आणि उपसरपंचपदी मोहन विरले यांची बिनविरोध निवड झाली. वैजनाथ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल दरेकर (राष्ट्रवादी) आणि उपसरपंचपदी यमुना कातकरी, तर मणिवली सरपंचपदी तुषार गवळी (शिवसेना) विराजमान झाले आहेत.

हेही वाचा –

Corona Vaccine: आता खासगी रुग्णालयात मिळणार कोरोनाची लस

- Advertisement -