घररायगडसावित्री पूल वाहून गेल्याने २० गावांचा संपर्क तुटला...

सावित्री पूल वाहून गेल्याने २० गावांचा संपर्क तुटला…

Subscribe

वाड्या-वस्त्यांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.

गेल्या तीन दिवसात पोलादपूर तालुक्यावर झालेल्या ढगफुटीमुळे सावित्री नदीवरील पितळवाडी जवळचा पूल वाहून गेला आहे. पोलादपूरपासून अंदाजे १० किलो मीटरवरचा हा पूल महत्वाचा होता. या पुलाच्या पुढे देवळे, करंजे, दाभीळ, लहूळसे, बोरज, उमरठ-रामाचे, उमरठ-खोपड, ढवळे, कामथे, चांदके, साखर, खडकवाडी, गोवले, खांडज, चिखली, आडावळे, खुर्द व आडावले बुद्रूक, मोरसडे अशी वीस बावीसगावे व वाड्या-वस्त्या अंतर्गत रस्त्याने जोडण्यात आल्या होत्या. मात्र अतिवृष्टीत पूल वाहून गेल्याने या सर्व गाव, वाड्या-वस्त्यांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे येथील जनतेसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले असले तरी ऐन पावसाळ्यात वैद्यकिय सेवा व आरोग्य सेवेची समस्या जनतेला प्रामुख्याने भेडसावणार आहे. तसेच दुर्बल घटकांसमोर पोटा-पाण्याचा प्रश्न उभा आहे. येथील दारिद्रय रेषेखालील जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य योजनेचा लाभ मिळणे रस्त्या अभावी अवघड झाले असून, दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गणपती उत्सव हा तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा सण नजीक आला आहे. या सणासाठी जगाच्या पाठीवर कोठेही असणारा चाकरमानी आपल्या मूळ गावी या सणाला कुटुंबासह येत असतो. यामुळे ऐन पावसाळ्यात पूल वाहून गेल्याने यंदा सणासाठी गावी येणारा चाकरमानी मुकणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने येथील जनतेचा संपर्क सुरू होण्यासाठी तसेच चाकरमान्यासाठी तातडीने नदीवर हंगामी पूल बांधून वाहतुक सुरू करावी, अशी मागणी येथील जनतेकडून होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Kundra Pornography Case : अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांकडून समन्स, चौकशीस हजर राहण्याचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -