Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर रायगड नागोठणेनजिक कार अपघातात सात जण जखमी

नागोठणेनजिक कार अपघातात सात जण जखमी

Subscribe

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी इको कारने विरुद्ध बाजुने येऊन स्विफ्ट डिझायर कारला दिलेल्या धडकेत सात प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

नागोठणे : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी इको कारने विरुद्ध बाजुने येऊन स्विफ्ट डिझायर कारला दिलेल्या धडकेत सात प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पुंडलिक बाळू शितब (रा.तांबडी रोहे) हा आपल्या ताब्यातील इको कार (एमएच०२/डीडब्ल्यू ९२२७) घेऊन मुंबई -गोवा महामार्गावरील नागोठणे बाजूकडुन वडखळकडे अतिवेगाने आणि चुकीच्या बाजूने चालवित होता. त्याचवेळी नागोठणे हद्दीतील निडी गावाजवळ आला असता समोरून वडखळ बाजूकडुन नागोठणेकडे येणार्‍या स्विफ्ट डिझायर कार (एमएच०१/बीके ८०१४) या वाहनाला ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितेश पाटील करीत आहेत. दम्यान, अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावर झालेली वाहतूक सुरळीत केली.

दोन्ही वाहन चालक जखमी
या अपघातात स्विफ्ट कारमधील प्रणित गव्हाणे, सुशांत गव्हाणे (दोघे राहणार नाना नानी पार्क,विरार),विश्वास तुकाराम गायकवाड(रामनवेलपाडा, विरार) आणि कार चालक केतन किशोर लोखंडे (भायखळा, मुंबई) तसेच इको कारमधील नंदीनी वल्हार आणि ईश्वरी वल्हार (दोघीही राहणार परवापाडा, विरार) आणि इको कारचालक पुंडलिक सितब जखमी झाले.जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावर कोळशाचा ट्रक आडवा
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ट्रकवर चालकाचा ताबा न राहिल्याने वडखळ बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणारा कोळशाने भरलेला ट्रक रस्त्यावर आडवा झाला. या अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही मार्गावर बराच काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.घटनेची माहिती मिळताच महामार्ग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक कोंडी दूर केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -