घररायगडपनवेलमध्ये सात वाहने जाळली; माथेफिरूला पोलिसांकडून अटक

पनवेलमध्ये सात वाहने जाळली; माथेफिरूला पोलिसांकडून अटक

Subscribe

शहरातील वाहनांची जाळपोळ करणार्‍या एका माथेफिरूला अखेर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने लावलेल्या आगीत ट्रॅक्टर, दुचाकी, आणि रिक्षा अशी सात वाहने जळाली आहे. नोव्हेंबर महिन्यात कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे गाड्यांना आग लावण्यात आली होती. यात तब्बल ४२ हून अधिक गाड्या जळाल्या होत्या. अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले होते.

पनवेल : शहरातील वाहनांची जाळपोळ करणार्‍या एका माथेफिरूला अखेर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने लावलेल्या आगीत ट्रॅक्टर, दुचाकी, आणि रिक्षा अशी सात वाहने जळाली आहे.

शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बार समोर उभी ठेवलेली दोन मोटारसायकल आणि पटेल हॉस्पिटल शेजारी अनिल झेरॉक्स येथे पार्क करून ठेवलेल्या तीन मोटारसायकली व जवळच जोशी आळी परिसरात उभी करून ठेवलेली एक रिक्षा त्याचप्रमाणे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील पार्किंग मध्ये उभा करून ठेवलेला एक ट्रॅक्टर अश्या चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करून ठेवलेली सात वाहने अज्ञात इसमाने शनिवारी सात जानेवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ टाकून जाळली.

- Advertisement -

या घटनेमुळे पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध घेतला असता त्याला अटक करण्यात आली आहे.

कामोठे मानसरोवर येथील घटना
नोव्हेंबर महिन्यात कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे गाड्यांना आग लावण्यात आली होती. यात तब्बल ४२ हून अधिक गाड्या जळाल्या होत्या. अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले होते. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापही यातील आरोपी सापडून आलेला नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -