घररायगडखोपोलीत पाणी टंचाई गंभीर; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

खोपोलीत पाणी टंचाई गंभीर; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Subscribe

जवळपास ६५ कोटी निधी खर्च करून खोपोलीत वाढीव पाणीपुरवठा कार्यान्वीत झाली. योजना कार्यान्वीत झाल्यावर शहरातील पाणी समस्या संपुष्टात येईल ही आशा फोल ठरत असून मागील दोन महिन्यापासून शहरातील अनेक रहिवासी भागांत दैनंदिन गरजेपुरते ही पाणी उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक रहिवासी संकुले व भागांतील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे, याबाबत अनियमित व असमान पाणी वितरण प्रमुख कारण असल्याचे दिसत असून पाणीपुरवठा विभाग व पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याने एप्रिल व मे या उन्हाळी दोन महिन्यात शहरातील पाणी संकट अधिक उग्र बनणार आहे.

खोपोली: जवळपास ६५ कोटी निधी खर्च करून खोपोलीत वाढीव पाणीपुरवठा कार्यान्वीत झाली. योजना कार्यान्वीत झाल्यावर शहरातील पाणी समस्या संपुष्टात येईल ही आशा फोल ठरत असून मागील दोन महिन्यापासून शहरातील अनेक रहिवासी भागांत दैनंदिन गरजेपुरते ही पाणी उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक रहिवासी संकुले व भागांतील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे, याबाबत अनियमित व असमान पाणी वितरण प्रमुख कारण असल्याचे दिसत असून पाणीपुरवठा विभाग व पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याने एप्रिल व मे या उन्हाळी दोन महिन्यात शहरातील पाणी संकट अधिक उग्र बनणार आहे.
वाढीव पाणीपुरवठा कार्यान्वीत झाल्यावर एक दीड वर्ष शहरात सर्वच भागांत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात पालिकेला यश आले होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून शहरातील विणानगर, मोगलवाडी, विहारी, लौजी, साईबाबा नगर, शीळफाटा अणि अन्य रहिवासी भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गरजेएवढे पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कधी पाताळगंगा नदी पात्रातील कमी पाणीपुरवठा, पंपिग प्रणालीतील नादुरुस्ती तर कधी जलवाहिनीची दुरुस्तीमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे स्पष्टीकरण पालिका कडून देण्यात येत आहे.
पावसाळ्या नंतर दोन महिने कुंपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होऊनही पाणी समस्या निर्माण होत नव्हती. मात्र उन्हाळी झळा वाढत असतांना, कुंपनलिका कोरड्या पडत असल्याने रहिवासी सोसायट्यांना फक्त पालिका कडून पुरवठा होणार्‍या पाण्यावर अवलंबून राहावे आहे. हा पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने अनेक ठिकाणच्या नागरिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षांनंतर खोपोली शहरातील अनेक भागांत पुन्हा टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिसून येत आहे. पाणी समस्या अशीच कायम राहिल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकीकडे पाणी समस्या वाढत असली तरी, दुसरीकडे पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी पालिका कडून जोरदार मोहीम सुरू असल्याने नागरिक अधिक संतप्त होत आहेत.

कृत्रिम समस्या
पाताळगंगा नदीत मुबलक पाणी आहे, मात्र पंपिग प्रणालीतील त्रुटी व अनियमित पाणी वितरण मुळे खोपोली शहरातील अनेक भागांत तीव्र समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या कृत्रिम असून योग्य नियोजनाने दूर होऊ शकते.

- Advertisement -

कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने उंचावर असलेल्या रहिवासी भागात व अनेक रहिवासी सोसायटयांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे.
सुरेश म्हात्रे,
रहिवासी ड्रीमलँड सोसायटी, विणानगर

कूपनलिका असल्याने मार्च महिन्यापासून अधिक पाणी मागणी वाढली आहे. पंपिग यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित असून अनेक ठिकाणी जलवाहिन्यात मात्र त्रुटी असल्याने ती कामे सुरू आहेत, सर्व भागांत समान वितरण होण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
विनय शिपाई,
वरिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग, खोपोली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -