घररायगडमाणगावमध्ये शिवसेना, काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दाखल

माणगावमध्ये शिवसेना, काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दाखल

Subscribe

निजामपूर विभागासाठी नागरिकांची खूप दिवसापासून रुग्णवाहिकेची मागणी प्रलंबित होती. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील करण्यात आले व विविध विकासकांमांचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

रायगड जिह्यात आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवड# सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.माणगाव तालुक्यात तर महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडली आहे. निजामपूर विभागात शिवसेनेला खिंडार पाडत निजामपूर ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गुरव ,मिलिंद फोंडके व काँग्रेस कार्यकर्ते श्रीकांत लोलगे यांच्यासह शेकडो शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे आणि महाड विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

२६ जानेवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यासपीठावर खासदार सुनिल तटकरे यांच्यासमवेत आमदार अनिकेत तटकरे, महाड पोलदपूर राष्ट्रवादी काँग्रेस विधा( क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर, माणगाव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, महिला आघाडी तालुका अध्यक्ष संगीता बक्कम,निजामपूर विभाग अध्यक्ष संदीप जाधव, निजामपूर शहराध्यक्ष महेश शिर्के, सचिव किरण पागार, युवा नेते सागर खानविलकर, माणगाव पंचायत समिती सभापती अलका जाधव, उपजिल्हाध्यक्ष शेखर देशमुख, जेष्ठ नेते इकबाल धनसे आणि विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही कधी मापात पाप करत नाही आणि हिशोबात कधी खोट करत नाही. काही दिवसांपूर्वी दाखणे ग्रामपंचायत मध्ये आमचे सहकारी प्रभाकर उभारे आजारी असताना त्याचा फायदा घेत राज्यात महाविकास आघाडीत मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेने कार्यकर्ते फोडण्याचे जे काम केले त्याचीच परतफेड आज निजामपूर येथील पक्षप्रवेशातून करत आहोत .व माणगाव नगरपंचायतमध्ये झालेल्या निसटत्या पराभवाची भर येणार्‍या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकित काढा अशा सूचना देखील खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्याना केल्या.

निजामपूर विभागासाठी नागरिकांची खूप दिवसापासून रुग्णवाहिकेची मागणी प्रलंबित होती. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील करण्यात आले व विविध विकासकांमांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ देखील पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -