घररायगडरायगडमध्ये आज नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी

रायगडमध्ये आज नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी

Subscribe

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या ६ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवार १० फेब्रुवारी रोजी होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेला तळे, म्हसळे, पाली आणि पोलादपूर, माणगाव, खालापूर अशा ३-३ ठिकाणी संधी मिळणार आहे.

पोलादपूर नगरपंचायतीत काँग्रेसच्या साक्षी गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या सोनाली गायकवाड यांची निवड ही औपचारिकता उरली आहे. माणगावमध्ये शिवसेना-काँग्रेस आघाडीचे ज्ञानदेव पोवार (काँग्रेस) यांचे नगराध्यक्षपदासाठी नाव निश्चित असताना त्यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची एकहाती सत्ता येणार आहे. येथे शेकापच्या एकमेव सदस्याने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांना रिंगण्यात उतरविण्यात आले आहे. तळे नगरपंचायतीत स्पष्ट बहुमत मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्मिता भोरावकर यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे.

- Advertisement -

म्हसळे नगरपंचायतीतही राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत (१७ पैकी १३ जागा) असले तरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र असहल काद्री यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. प्रत्येकी २-२ जागा मिळालेल्या शिवसेना-काँग्रेस आघाडीकडून डॉ. मुईज शेख (काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केला आहे. तर प्रथमच निवडणूक झालेल्या पाली नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीच्या गीता पालरेचा यांच्या विरोधात शिवसेनेचे सचिन जवके यांनी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी १० जागा मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीच्या पालरेचा यांचा विजय निश्चित झाला आहे. तर खालापूर नगरपंचायतीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याने पाठिंबा दिल्याने आणि ७ जागा मिळालेल्या शेकापने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या रोशनी मोडवे या एकमेव उमेदवार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -