घररायगडमहाराष्ट्राला ओरबडणे चालू देणार नाही- ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्राला ओरबडणे चालू देणार नाही- ठाकरेंचा इशारा

Subscribe

पोलादपूर-: गुजरात तुम्हाला समृद्ध करायचा असेल तर जरूर करा, पण महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणार असाल तर ते चालू देणार नाही; नवीन उद्योग तुम्ही न्या, पण महाराष्ट्राच्या हक्काचे जर तुम्ही ओरबाडत असाल तर यावेळी ते चालणार नसल्याचा इशारा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपाला दिला आहे. (Shiv Sena chief Udhav Thackeray’s warning in the meeting on the occasion of Jan Samswad Yatra)

येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेनिमित्तच्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, विधानसभा उमेदवार स्नेहल जगताप, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, स्थानिक नेते नानासाहेब जगताप, दिलीप भागवत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

तथाकथीत भ्रष्टाचाराबाबत शासकीय यंत्रणांचा ससेमिरा विरोधकांच्या पाठीमागे लावून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचे ठाकरे म्हणाले. आरोप करणारे भाजप नेते भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात किंवा युतीत घेत असून, गोमुत्र शिंपडल्याने शुद्ध झाल्याचे प्रमाणपत्रही देत असल्याचा टोला त्यांनी लगावला. भ्रष्टाचारी पक्ष आणि नेते कोण हे जनता ओळखत असून, जनता या गद्दारांना टकमक टोक दाखविल्याशिवाय राहाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी गॅरंटीचा पुन्हा एकदा खिल्ली उडवत ठाकरे यांनी जनधनपासून उज्ज्वला ते सध्याच्या जल मिशनपर्यंतच्या अनेक योजनांचा पाढा वाचत मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले. शिंदे गटाचे स्थानिक आमदार भरत गोगावले यांना त्यांनी आपल्या भाषणात अनेकदा कोपरखळ्या लगावत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे सांगितले. अजित पवार गटावरही ठाकरे यांनी टीकेचा भडीमार केला. स्नेहल जगताप आणि अनंत गीते यांचीही भाषणे झाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -