घररायगडआपटा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला, सरपंचपदी शिवसेनेच्या नाजणीन खलील पटेल

आपटा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला, सरपंचपदी शिवसेनेच्या नाजणीन खलील पटेल

Subscribe

महाविकास आघाडीच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नाजणीन खलील पटेल यांची सरपंचपदी एकमताने निवड केली. आपटा ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली आपटा ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. शिवसेनेची महिला सरपंच होण्याचा मान नाजणीन पटेल यांना मिळाला आहे.

महाविकास आघाडीच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नाजणीन खलील पटेल यांची सरपंचपदी एकमताने निवड केली. यावेळी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शिवसेना रायगड उपजिल्हा संघटक परेश भाई पाटील, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, मध्य रेल्वेचे केंद्रीय सल्लागार अभिजित पाटील, शेकाप अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.आरीफ दाखवे, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ मंगल पाटील, उपतालुकाप्रमुख डॉ घरत, पनवेल तालुका संघटक मर्फीशेठ, विभागप्रमुख चंद्रकांत टकले, माजी उपसरपंच ऋषभ धुमाळ,स्वप्निल भुवड, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -