घररायगडरायगड जिल्ह्यात शिवसेनेची पालकमंत्री हटाव मोहीम, जिल्हा पदाधिकारी बैठकीत एकमुखाने मागणी

रायगड जिल्ह्यात शिवसेनेची पालकमंत्री हटाव मोहीम, जिल्हा पदाधिकारी बैठकीत एकमुखाने मागणी

Subscribe

काही दिवसांपूर्वी महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री हटाव अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत गोगावले यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्री नाही, आमदार बदलण्याची वेळ आली आहे. तसेच इतर प्रतिक्रिया देऊन टीका करण्यात आली.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी सरकार असून रायगड जिल्ह्यात मात्र आघाडीत धुसफूस सुरू आहे. जिल्ह्यातील शिवसेनाच्या तीनही आमदारांसह, जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रणशिंग फुंकत पालकमंत्री आदिती तटकरे हटाव मोहीम हाती घेतली. तसेच खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यापुढे आघाडीचा धर्म न पाळल्यास जिल्ह्यातून राष्ट्रवादी हद्दपार करण्याची गर्जना रायगड जिल्हा शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत गुरुवारी अलिबागमध्ये करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री हटाव अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत गोगावले यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्री नाही, आमदार बदलण्याची वेळ आली आहे. तसेच इतर प्रतिक्रिया देऊन टीका करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी अलिबाग थळ येथे रायगड जिल्हा शिवसेना पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार भरत गोगावले यांच्यापाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असून, पालकमंत्री हटाव अशी भूमिका सर्वांनी घेतली.

- Advertisement -

यावेळी आमदार भारत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, मजी आमदार तुकाराम सुर्वे, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार – आमदार भरत गोगावले
जिल्ह्यात जी विकासकामे होतात किंवा निधी उपलब्ध होतो तो आमच्यामुळेच अशी भूमिका पालकमंत्री घेतात. जिल्ह्यात पर्यटन व जल जीवन मिशन अंतर्गत मोठा निधी उपलब्ध झाला आहे. दोन्ही खात्याचे मंत्री शिवसेनेचे असून हा निधी आम्ही मागणी केल्याने प्राप्त झाला आहे. मात्र पालकमंत्री जनतेची दिशाभूल करीत आहेत. इतर कामांबाबत हेच सुरू आहे. तसेच आमदार बदलण्याची गरज असल्याचे ते बोलतात. मात्र त्यांच्या दहा पिढ्या आल्या तरी त्यांना शक्य होणार नाही. आम्ही काम करतो म्हणून लोकांनी सलग तीन वेळा निवडून दिले. आता पालकमंत्री बदलण्याची वेळ आली आहे. यासाठी आम्ही तीन आमदार व प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या वतीने निवेदन देणार आहोत. जिल्ह्यात शिवसेनेचा पालकमंत्री द्यावा अशी मागणीही करणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्ह्यातून राष्ट्रवादीला हद्दपार करू – आमदार महेंद्र दळवी
सर्व कामांचे श्रेय पालकमंत्री घेतात. आमच्यामुळेच सर्व झाले असा दिखावा त्या करतात. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार असून, शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने सुधारावे नाहीतर त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करू. पालकमंत्री हटाव ही आमदार भरत गोगावले यांनी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक नसून जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक यांचे मत आहे. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तसेच येणार्‍या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपण एकटे लढलो तरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकविल्या शिवाय राहणार नाही, असे मत आमदार महेंद्र दळवी यांनी मांडले.

ते स्वप्न राष्ट्रवादीने विसरावे – आमदार महेंद्र थोरवे
पालकमंत्री आदिती तटकरे या शिवसेनेसोबत भेदभाव करीत आहेत. जिल्ह्यात आलेल्या निधी वाटपात शिवसेनेसोबत भेदभाव करण्यात येतो. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची वेळ आली आहे. आमदार भरत गोगावले यांच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत. राष्ट्रवादीने महाडचा आमदार बदलण्याचे स्वप्न विसरावे, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -