घररायगडऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर मोठ्या थाटात शिवरात्री रुद्राभिषेक

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर मोठ्या थाटात शिवरात्री रुद्राभिषेक

Subscribe

राजे शिवछत्रपती महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या याठिकाणी चरणस्पर्शनी पावन झालेल्या ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर मोठ्या थाटात शिवरात्री रुद्राभिषेक करण्यात आला. मुरुड येथील पद्मदुर्ग जागर आणि गड संवर्धन समिती तसेच कोकणकडा मित्र मंडळ महाड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ॐ श्री पंचाक्षर महेश्वर जंगम एकावन्न स्वामींचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या पौरोहित्य मंडळचा २२८वा मासिक शिवरात्री रुद्राभिषेक सपत्नीक सोहळ्याच्या निमित्त ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर गोंड्याची फुले आंबाची टाळ यांनी किल्ला सजविण्यात आला होता.

मुरूड: राजे शिवछत्रपती महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या याठिकाणी चरणस्पर्शनी पावन झालेल्या ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर मोठ्या थाटात शिवरात्री रुद्राभिषेक करण्यात आला. मुरुड येथील पद्मदुर्ग जागर आणि गड संवर्धन समिती तसेच कोकणकडा मित्र मंडळ महाड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ॐ श्री पंचाक्षर महेश्वर जंगम एकावन्न स्वामींचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या पौरोहित्य मंडळचा २२८वा मासिक शिवरात्री रुद्राभिषेक सपत्नीक सोहळ्याच्या निमित्त ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर गोंड्याची फुले आंबाची टाळ यांनी किल्ला सजविण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या सोहळाकरिता मुरुड शहरातील पंचक्रोशी भागातील ११जोडपी सहभागी झाले होते.

शिवलिंगावर २१ धारेचा रुद्राभिषेक
राजपुरोहित – प्रकाश स्वामी जंगम यांच्या कडुन प्रथम किल्ल्यातील कोटेश्वरी मातेची पुजा करण्यात आली.त्यानंतर होम, दुधाने तसेच समुद्राचा पाण्यानी शिवलिंगावर २१ धारेचा रुद्राभिषेक ११ जोडप्यांकडून करण्यात आले.
यावेळी कोकणकडा मित्र मंडळ महाड अध्यक्ष सुरेश पवार, राहुल कासार, प्रदिप बांगडे, रुपेश जामकर, सुनील शेळके, महेश साळुंखे, मंगेश मोहिते, प्रमोद मसाल, राजेश गुप्ते, जिनेंद्रा बोगार, मदन हनुमंते, अच्युत चव्हाण, अमीत पाटील आदिंसह शिवप्रेमी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -