घररायगडफार्मा पार्कला जमिनी देण्यास सहा हजार शेतकऱ्यांचा विरोध

फार्मा पार्कला जमिनी देण्यास सहा हजार शेतकऱ्यांचा विरोध

Subscribe

कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे खासदार सुनील तटकरे रायगडात प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पाला लवकर मान्यता द्या असे पत्र केंद्रीय रसायन मंत्र्यांना का लिहितात, असा सवाल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केला आहे.

कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे खासदार सुनील तटकरे रायगडात प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पाला लवकर मान्यता द्या असे पत्र केंद्रीय रसायन मंत्र्यांना का लिहितात, असा सवाल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केला आहे. तटकरे यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी मंत्र्यांना दिलेले पत्र सादर केरण्यात आले.

राज्य सरकारने मुरुड आणि रोहे तालुक्यात फार्मा पार्क प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. प्रकल्पाची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, एमआयडीसीमार्फत या प्रकल्पासाठी भू संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुरुड तालुक्यातील १०, तर रोहे तालुक्यातील ७ गावांतील ३ हजार हेक्टर जमिनी संपादीत केल्या जाणार आहेत. यासाठी सध्या शेतकर्‍यांना ३२/२ च्या भू संपादनाच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मात्र प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. जवळपास ६ हजार शेतकर्‍यांनी प्रकल्प नको, अशी भूमिका मांडली आहे. आंदोलने आणि निदर्शने केली आहेत. खासदार तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदनेही दिली आहेत. मात्र शेतकर्‍यांनी निवेदन दिल्यानंतर तटकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांकडे प्रकल्पाला मंजुरी द्या अशी मागणी केली ही जनतेची फसवणूक असल्याचा घणाघात मोहिते यांनी केला.

प्रकल्पासाठी गुरुवारी, १८ फेब्रुवारी रोजी जनसुनावणी होणार आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता भू संपादन आणि प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे ही जनसुनावणी होऊ देणार नाही. जनभावना लक्षात घेऊन सरकारने संपादन प्रक्रिया रद्द करावी अन्यथा जनतेच्या रोषाला समोरे जावे लागेल, असा इशारा मोहिते यांनी दिला. एकीकडे जिल्ह्यात यापूर्वी एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या जागा वापराविना पडून तर दुसरीकडे नवीन प्रकल्पांसाठी जागा संपादित केल्या जात आहेत. आधी पडून असलेल्या जागांवर प्रकल्प उभारा, मग नव्याने जागा संपादित करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

- Advertisement -

हेही वाचा –

थोडे दिवस थांबा, कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही हे स्पष्ट होईल; अनिल परब यांचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -