घररायगडमहड गावात गाभण गायीसह वासराची कत्तल; महिलांचा आक्रोश 

महड गावात गाभण गायीसह वासराची कत्तल; महिलांचा आक्रोश 

Subscribe

महड गावातील तुषार पाटील यांच्या गोठ्यात बांधलेली गाभण गाय आणि एक वासरू यांची चोरी करून हाळ गावच्या हद्दीतील निर्मनुष्यस्थळी असलेल्या एक पत्र्याच्या खोलीत डांबून कत्तल केल्याची घटना बुधवारी घडली आहे. गायीचे संगोपन करीत असतानाच गायीची कत्तल केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गाय आणि वासरू पाहून तुषार पाटील आणि घरातील महिलांना अश्रू अनावर झाले. तर घटनेची माहिती सर्वत्र पसरताच महड गावातील ग्रामस्थ, तरूण आणि बजरंग दल कार्यकर्ते घटनास्थळी दाखल पोहचले होते.पोलिसांनी तात्काळ जागा मालकाला ताब्यात घेतले. मात्र नागरिकांचा उद्रेक वाढतच गेला.

खोपोली: महड गावातील तुषार पाटील यांच्या गोठ्यात बांधलेली गाभण गाय आणि एक वासरू यांची चोरी करून हाळ गावच्या हद्दीतील निर्मनुष्यस्थळी असलेल्या एक पत्र्याच्या खोलीत डांबून कत्तल केल्याची घटना बुधवारी घडली आहे. गायीचे संगोपन करीत असतानाच गायीची कत्तल केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गाय आणि वासरू पाहून तुषार पाटील आणि घरातील महिलांना अश्रू अनावर झाले. तर घटनेची माहिती सर्वत्र पसरताच महड गावातील ग्रामस्थ, तरूण आणि बजरंग दल कार्यकर्ते घटनास्थळी दाखल पोहचले होते.पोलिसांनी तात्काळ जागा मालकाला ताब्यात घेतले. मात्र नागरिकांचा उद्रेक वाढतच गेला. येथील गुरांची कत्तल करण्यासाठी तयार केलेले शेड जमिनदोस्त करा, अशी मागणी जोर धरू लागली आणि नागरिकांचाही संयम सुटत चालल्याने नागरिकांनीच हे पत्र्याचे शेड उध्वस्त करण्याचे पाऊल उचलल्याने पोलिसांनी जमावाला अडवून पत्र्याचे तात्पुरते तयार केलेले शेड हटविण्यात आले मात्र तरीही जमाव शांत होत नसल्याने यानंतर आरसीएफचे जवान आणि पोलीस दल तैनात करून जमाव पांगविण्यात आला. दरम्यान, या घटनांमुळे घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी प्रभारी पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे,खालापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, सह्य पोलीस निरीक्षक आरोठे पोलिसांसमवेत घटनास्थळी पोहचून रितसर पंचनामा केला आहे.

आरोपीवर कडक कारवाई करा
जमावाला शांत केले मात्र सदरचे सर्वच शेड तोडावे अशी हल्लाबोल करीत कार्यकर्त्यांनी केल्याने शेवटी पोलीस बाळाचा वापर करावा लागला तर जेसीबीने सदरचे मयत गुरे दफन करण्यात आले आणि आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची कसून चौकशी करून संबंधीत आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी नागरिकांसमोर सांगितले तर असा प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपीला कडक शासन करावे अशी मागणी महड ग्रामस्थ आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

- Advertisement -

पत्र्याच्या शेडमध्ये गाय, वासरू रक्ताच्या थारोळ्यात
अष्टविनायकापैकी असलेले वरदविनायक महड गावातील शेतकरी तुषार पाटील यांच्या मालकीची गाय आणि तिचे लहान वासरू गोठ्यात मंगळवारी रात्री बांधून ठेवले होते.गाय ही गाभण होती. बुधवारी सकाळी गोठ्यात गाय आणि वासरू गायब असल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्याने शोधाशोध सुरू केली असता गावच्या मागीलबाजूस इंग्लिश स्कूच्या मागे शोधत आला.यादरम्यान बाजूलाच असणार्‍या एक पत्र्याचे शेडमध्ये डोकावल्याने सदरचे गाय आणि वासरू मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने पाटील यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. या घटनेची माहिती महड गावातील ग्रामस्थाना दिल्याने मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले, त्यांनतर बजरंग दलाचे कार्यकर्तेही दाखल झाले. सदरचा प्रकार पाहिल्यानंतर सर्वांच्या संताप अनावर झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -