Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर रायगड एसआरटी तंत्रज्ञान ही कृषी क्षेत्रातील बदलाची नांदी- मुख्यमंत्री शिंदे

एसआरटी तंत्रज्ञान ही कृषी क्षेत्रातील बदलाची नांदी- मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

एसआरटी हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान असून हे तंत्रज्ञान वापरून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे,ही बदलाची नांदी आहे. हे शासन शेतकर्‍यांसाठी चांगले निर्णय घेत असून शेतकर्‍यांसाठी कटिबद्ध आहे. कृषिभूषण शेतकरी आणि एसआरटीचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे याना मी याअगोदर पासून ओळखत असून जेव्हा शेतीचा विषय निघतो तेव्हा भडसावळे यांचे नाव साहजिकच माझ्या तोंडून निघते. आनंदी शेतकरी सशक्त भूमाता हि चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

कर्जत: एसआरटी हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान असून हे तंत्रज्ञान वापरून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे,ही बदलाची नांदी आहे. हे शासन शेतकर्‍यांसाठी चांगले निर्णय घेत असून शेतकर्‍यांसाठी कटिबद्ध आहे. कृषिभूषण शेतकरी आणि एसआरटीचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे याना मी याअगोदर पासून ओळखत असून जेव्हा शेतीचा विषय निघतो तेव्हा भडसावळे यांचे नाव साहजिकच माझ्या तोंडून निघते. आनंदी शेतकरी सशक्त भूमाता हि चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
नेरळ येथील सगुणा बाग हे केवळ कृषी पर्यटन केंद्र नाही तर शेतकर्‍यांसाठी कायम विद्यापीठ राहिले आहे. शेतकर्‍यांसाठी नवेनवे प्रयोग सगुणा बागचे सर्वेसर्वा कृषिभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी केले आहेत. याच सगुणा बागेत एसआरटी.शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवाद २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, देवगिरी कल्याण आश्रम बारीपाडा, धुळेचे प्रांत अध्यक्षा चैतराम पवार, कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे, महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले, कृषीरत्न शेतकरी सगुणा बाग चंद्रशेखर (दादा) भडसावळे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रकल्प संचालक परिमल सिंग, जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, दहिवली तर्फे वारेदी ग्रामपंचायत सरपंच मेघा अमर मिसाळ, कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सगुणा फाउंडेशन डॉट एनजीओ या वेबसाईटचे प्रतिकासात्मक उद्घाटन करण्यात येऊन पोकरा प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय कोळेकर, एसआरटी शेतकरी परशुराम आगिवले, अनिल निवळकर, चित्रकार राकेश देवरुखकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ५२ शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.

बळीराजा आपल्या देशाचा कणा आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश असून शेतीचा शोध लागल्यापासून ते आजवरची शेती यात फरक आहे. आज पर्यावरण बदलते आहे, रासायनिक शेती फोफावली आहे, स्पर्धेचे युग आहे त्यामुळे गरज वाढली आहे. अशात अवकाळी, पिकावरील रोग अशा दुष्टचक्रातून बळीराजाला तोंड देत पुढे जावे लागत आहे. तेव्हा शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान आवश्यक असून ते चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी विकसित केले याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो.
– एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री

- Advertisement -

एसआरटी म्हणजे भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकर्‍याला आनंदी आणि आत्मविश्वासी करणारी पिकरचना होय. जमिनीची धूप न होता, कमी खर्चात नांगरणी, चिखलणी आणि कोळपणी न करता, भरघोस उत्पन्न देणारी शेती पद्धती शेतकर्‍यांना आवडली. एका वर्षात किमान तीन पीके एसआरटी पद्धतीने घेता येत असल्याने अनेक राज्यातील शेतकरी आकर्षित झाले आहेत.
– चंद्रशेखर भडसावळे,
कृषिभूषण शेतकरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -