Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर रायगड उद्धव ठाकरेंच्या सभेची महाडमध्ये जय्यत तयारी 

उद्धव ठाकरेंच्या सभेची महाडमध्ये जय्यत तयारी 

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जाहीर सभा महाडमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आली असून या सभेची जय्य्त तयारी सुरु आहे. या सभेतून उद्धव ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव स्थानिक शिंदे गटाचा कशा पद्धतीने समाचार घेणार, याची आतुरता जनतेला लागली आहे. या जाहीर सभेस नागरिकांना उपस्थित राहता येऊ नये याकरिता पुरेपूर प्रयत्न स्थानिक आमदार करत असल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांनी केला आहे.

महाड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जाहीर सभा महाडमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आली असून या सभेची जय्य्त तयारी सुरु आहे. या सभेतून उद्धव ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव स्थानिक शिंदे गटाचा कशा पद्धतीने समाचार घेणार, याची आतुरता जनतेला लागली आहे. या जाहीर सभेस नागरिकांना उपस्थित राहता येऊ नये याकरिता पुरेपूर प्रयत्न स्थानिक आमदार करत असल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांनी केला आहे.
सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सभेची माहिती देण्यात आली. या सभेस उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असून यांच्या समवेत सुभाष देसाई, अंधारे, जाधव, अनंत गीते हे देखील उपस्थित राहत आहेत. जागेची क्षमता पाहता शहरात देखील स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना ही सभा पाहता येणार आहे. या सभेत महाडमधील स्व. माणिक जगताप यांच्या कन्या आणि भाऊ यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. याबाबत बोलताना त्यांनी या पक्ष प्रवेशामुळे पक्षाची ताकत वाढणार असून भविष्यात गद्दार लोकांना चोख उत्तर दिले जाईल असे नवगुणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेत एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने जुन्या निष्ठावान शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामुळे या सभेला तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -