घररायगड  नेताजी भात गिरणी च्या सेवेचा लाभ घ्यावा - चेअरमन परेश देशमुख 

  नेताजी भात गिरणी च्या सेवेचा लाभ घ्यावा – चेअरमन परेश देशमुख 

Subscribe

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मसाला, पोहा, धान्य कडधान्य दळून देण्याची सुविधा स्वस्त आणि दर्जेदार असल्याने या सेवेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन विधितज्ञ आणि नेताजी सहकारी भात गिरणी चे चेअरमन परेश देशमुख यांनी केले आहे.

चौक: सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मसाला, पोहा, धान्य कडधान्य दळून देण्याची सुविधा स्वस्त आणि दर्जेदार असल्याने या सेवेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन विधितज्ञ आणि नेताजी सहकारी भात गिरणी चे चेअरमन परेश देशमुख यांनी केले आहे.

खालापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात तालुक्यात प्रथम भात गिरणी ची स्थापना २ मे १९५९ रोजी तत्कालिन सहकार क्षेत्राच्या माध्यमातून चौक येथे करण्यात आली.त्यावेळी संपूर्ण तालुक्यातून भात भरडायी करण्यासाठी लोक बैल गाडीतून भात घेऊन येत असत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला मोठा लाभ मिळत होता. आजही तालुक्यात नेताजी सहकारी भात गिरणी ही एकमेव आधार आहे. विद्यमान संचालक मंडळ हे क्रियाशील आहे. येथील शेतकरी आणि स्थानिक जनतेला लाभ मिळावा यासाठी संचालक मंडळ यांनी मसाला चक्की, धान्य, कडधान्य चक्की,पोहा गिरणी,हळद आणि धणा पावडर यांच्या दळणासाठी नवीन यंत्रणा बसवण्यात आली आहे,तिचे उद्घाटन आज महाराष्ट्र दिनी चेअरमन परेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.खाजगी गिरणी पेक्षा प्रति किलो पाच रूपयांनी हळद, मिरची व धना दळण स्वस्त आहे.यावेळी खालापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर जयवंत संभाजी पाटील व धनंजय महादेवराव देशमुख यांची संचालक पदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्हा. चेअरमन शरीफ भालदार, संचालक नथुराम कांगे, सुदाम कडपे,रघुनाथ फराट,विनायक देशमुख, अंकुश गायकवाड, भालचंद्र थोरवे, अनंत म्हात्रे,सौ. अंजली देशमुख,सौ. अरुणा पाटील आदी उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -