घररायगडपनवेलमधील पंचशील बालगृहातील मुले झाली कोरोनामुक्त

पनवेलमधील पंचशील बालगृहातील मुले झाली कोरोनामुक्त

Subscribe

सर्व औषधांचा पुरवठाही पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागच्यावतीने करण्यात येत होता.

नवीन पनवेल येथील पंचशील बालगृहातील आठ मुले व आठ मुली कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांना महापालिकेच्या नवीन पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील मोबाईल टिमने व इंडिया बुल्स येथील विलगीकरणाकक्षाच्या टिमने वेळेवर उपचार दिले. खांदा कॉलनी येथील पंचशील बालगृहामध्ये काही मुले बाधित झाले असल्याची माहिती कळताच आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या सुचेनेनूसार महापालिकेने आपले वैद्यकिय पथक त्याठिकाणी पाठवण्यात आले होते. सगळ्यांची चाचणी केल्यानंतर १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यातील आठ मुलांना सुरूवातीला इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले. त्यातील तीन मुलांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अॅडमिट केले होते. काही दिवसांनंतर आठ मुली पॉझीटिव्ह आल्याचे कळाल्यावर त्यांनाही इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले .

या बालगृहातील मुलांना जवळचे असे फारसे नातेवाईक नसल्याने पालिकेनी यांची जबाबदारी घेऊन मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकिय टिम प्रत्येकवेळी येथील मुले आजारी झाल्याचे समजताच तपासणी करून उपचार करत होती. त्यांना लागणाऱ्या सर्व औषधांचा पुरवठाही पालिकेच्या वैद्यकिय विभागच्यावतीने करण्यात येत होता. तसेच इंडिया बुल्स येथेही या मुलांची चांगल्याप्रकारे काळजी घेण्यात आली. त्यांची वेळचेवेळी तपासणी, औषधे, जेवण या सर्वांकडे विशेष लक्ष देण्यात आले. तसेच या बालगृहातील सर्व मुलांच्या चाचण्यां करण्यात आल्या,औषध फवारणी करण्यात आली.

- Advertisement -

पालिकेने केलेल्या उपचाराचा इथल्या बाधितांना मोठा दिलासा मिळाला. इथल्या मुलांनी कोरोनांवर मात केली आणि अजूनही आठ मुली विलगीकरण केंद्रामध्ये उपचार घेत आहेत. त्यांना थोड्याच दिवसात डिस्चार्ज देणार असल्याचे नोडल अधिकारी डॉ. बसवराज भोईटे यांनी सांगितले.


हेही वाचा – यंदाही शालेय अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -