घररायगडसततच्या वणव्यांमुळे सरसगडाचे वैभव लुप्त

सततच्या वणव्यांमुळे सरसगडाचे वैभव लुप्त

Subscribe

सरसगड किल्ल्यावर डिसेंबरपासून ४ ते ५ वेळा मोठे वणवे लागल्यामुळे किल्ल्याचे वैभव लुप्त झाले आहे. गडावरील वृक्षराजी आणि पशुपक्ष्यांचे अधिवास, तसेच अन्न जळून खाक झाल्यामुळे हे वणवे रोखण्यासाठी ठोस उपयोजना करण्याची गरज स्थानिक आणि दुर्गप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

येथील सरसगड किल्ल्यावर डिसेंबरपासून ४ ते ५ वेळा मोठे वणवे लागल्यामुळे किल्ल्याचे वैभव लुप्त झाले आहे. गडावरील वृक्षराजी आणि पशुपक्ष्यांचे अधिवास, तसेच अन्न जळून खाक झाल्यामुळे हे वणवे रोखण्यासाठी ठोस उपयोजना करण्याची गरज स्थानिक आणि दुर्गप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. वणव्यामागील कारणे गुलदस्त्यात असली तरी वणवा लागल्याचे समजताच स्थानिक तरुण आणि वनरक्षक वणवा विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र तीव्र उतारामुळे अनेकदा त्यांना मागे फिरावे लागले. यंदा ४ ते ५ वेळा आणि खूप मोठ्या प्रमाणात सरसगडावर वणवे लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शिवऋृण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चेतन म्हस्के यांनी सांगितले की, गडावर अनेक वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धन केले जात आहे. यंदा देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. मात्र वणव्यांमुळे ही सर्व झाडे जळाली आहेत.

बर्याचवेळा योग्य सामग्री नसणे, आगीचे रौद्र रूप, झाडी-झुडपे, कुयली आणि तीव्र उतार आदींचा अडसर येतो. सततच्या वणव्यांमुळे वृक्षराजी व पशुपक्षी यांच्याबरोबरच ऐतिहासिक ठेवा देखील धोक्यात येत आहे. परिणामी वणवे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

वणव्यांमुळे वाताहत

किल्ल्याच्या चारही बाजूने वणवे लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे आणि वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे पशूपक्ष्यांची अन्नपाण्यासाठी खूप तडफड होत आहे. मोर, माकड आणि भेकर हे प्राणी अन्नपाण्यासाठी गावात येत आहेत. वानरे आणि माकडे तर सर्रास गावात हिंडत असतात. वणव्यांमुळे तटबंदी, बुरूज ढिले झाले आहेत. काही वेळेस तेथून दगड खाली घरंगळत येतात.

प्राचीन एैतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले पाली हे गाव सरसगडाच्या पायथ्याशी वसले आहे. शिवाजी महराजांनी या गडाचे महत्त्व ओळखून गडास स्वराज्यात दाखल करून घेत दुरुस्तीसाठी दोन हजार होन मंजूर केले. यानुसार दुर्गमता आणि विपुल जलसंचय यावर विशेष भर देऊन गडाची बांधणी करण्यात आली. दूरवर टेहाळणी करण्यास आणि इशारा देण्यास ‘सरस’ म्हणून किल्ल्यास सरसगड नाव देण्यात आले. मात्र पुरातत्व विभागाचे किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात वणव्यांमुळे गडाचे वैभव काळवंडले जात आहे.
– उमेश मढवी, दुर्गप्रेमी

- Advertisement -

यंदा सरसगडावर अधिक वणवे लागले आहेत. सातत्याने वणवे लागल्याने झाडेझुडपे आणि गवत जळून जाते. स्वाभाविक मातीची प्रचंड प्रमाणात धूप होते आणि यामुळे ऐतिहासिक वास्तू ढासळण्याचा धोका आहे. तसेच तेथील वन्य प्राण्यांचा अधिवास देखील नष्ट होतो. वणवे रोखण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करतात. तसेच प्रबोधन आणि जनजागृती देखील केली जात आहे.
– समीर शिंदे, वन क्षेत्रपाल, पाली-सुधागड

हेही वाचा –

मुंबईत हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लॅन्टजवळ दगाफटका होऊ शकतो – महापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -