घररायगडपाणी प्रश्नावर प्रशासनासह स्थानिकांची भूमिका महत्त्वाची - आदिती तटकरे

पाणी प्रश्नावर प्रशासनासह स्थानिकांची भूमिका महत्त्वाची – आदिती तटकरे

Subscribe

पाण्याचा प्रश्न सोडविताना शासकीय अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

पाण्याचा प्रश्न सोडविताना शासकीय अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात असून, याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचा देखील विकास हातात घेण्यात आला आहे. या गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता आढावा शुक्रवारी किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. युवराज संभाजीराजे, खा. सुनील तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, पंचायत समिती सभापती सपना मालुसरे आदी उपस्थित होते.

संभाजीराजे यांनी किल्ल्यावर सुरू असलेल्या कामांची माहिती देताना परिसरातील २१ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापरत शिवकालीन जलस्त्रोत पुन्हा पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. मकरंद अनासपुरे यांनी शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत शोधून तो पुनर्जिवित करणे हे नामचे काम असून, पाण्याबरोबर या परिसरात प्रत्येक पर्यटकाने आणि शिवभक्ताने एक झाड लावून त्याची जोपासना करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

नाना पाटेकर यांनी जात, धर्म आणि पक्ष सोडून काम केले पाहिजे असे सांगून महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काम करण्याचे भाग्य लाभल्याने सुरुवातीस दोन गावांतील पाणी प्रश्न तडीस नेऊ असे सांगितले. तर परिसरात काळ जलविद्युत प्रकल्प भूमिपूजन आपण केले असून, अद्याप पूर्ण झाला नसल्याने परिसरातील पाणी प्रश्न कायम असल्याची खंत जगताप यांनी व्यक्त केली.

नानांचा टोला…

आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला सुरुवात झाल्यानंतर आमदार भरत गोगावले यांचे आगमन झाले. आढावा बैठकीत नाना पाटेकर यांनी बोलण्यास सुरुवात करताना उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांमुळे ही महायुती झाल्याचे सांगताना बैठकीला वेळेत येत जा असा शाब्दिक टोलाही गोगावले यांना लगावला. आम्ही तर पुण्याहून वेळेत हजर झाल्याचे सांगण्यास विसरले नाहीत. यावेळी उपस्थितांत खसखस पिकली.

- Advertisement -

हेही वाचा –

जगभरातून होतोय Lockdown चा शोध, देशात महाराष्ट्र अव्वल !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -