घररायगडवालाच्या शेंगाचा हंगामा सुरु; मुरूडमधील शेतकरी पिक घेण्यास आतुर

वालाच्या शेंगाचा हंगामा सुरु; मुरूडमधील शेतकरी पिक घेण्यास आतुर

Subscribe

तालुक्यात सध्या वालाच्या हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी पिक घेण्यास आतुर आहे वाल आणि चवळीच्या शेंगा तसेच कलिगंडसाठी थंडीचा हंगाम खुप उपयक्त आहे. थंडीत पडणार्‍या दवावर हे पिक तयार होते. प्रथमच थंडी जास्त आसल्याने हे पिक मागील वर्षांपेक्षा जास्त मिळेल, असा अंदाज येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत

मुरूड:  तालुक्यात सध्या वालाच्या हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी पिक घेण्यास आतुर आहे वाल आणि चवळीच्या शेंगा तसेच कलिगंडसाठी थंडीचा हंगाम खुप उपयक्त आहे. थंडीत पडणार्‍या दवावर हे पिक तयार होते. प्रथमच थंडी जास्त आसल्याने हे पिक मागील वर्षांपेक्षा जास्त मिळेल, असा अंदाज येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सदरचे पिक तयार होण्यासाठी चार महिन्याचा अवधी लागतो. पिकाचा सूंगध वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतो.वालाची रोपे हे रानटी डुकाराचे आवडते खाद्य असल्याने त्या प्राण्याला या पिकांपासून दूर ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना खूप मेहनत घ्यावी लागते.या पिकापासुन ३० ते ३५ हजाराचा फायदा होतो. यावेळी थंडी जास्त पडल्याने पिकात वाढ झाल्याने तो फायदा ४०ते४५ हजारावर जाऊ शकतो. यावेळी खुप थंडी आसल्याकारणाने लवकर वालाच्या शेंगा आणि चवळी पिक येऊन मुरुड बाजारात येणास सुरुवात झाली असून सध्या १ पायली १५० रुपये दर आहे.

पोपटीच्या शेंगांची चवच भारी
मुरुड पंचक्रोशीतील उंडरगाव,खारअंबोली,जोसरांजण, तेलवडे ,वाणदे, मजगांव, नादगांव, नागशेत या परिसरात हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.आता लवकरच पोपटीचा हंगाम सुरु होणार असून लोक या गावठी शेंगाची आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती नागशेत येथील परशुराम ठाकुर यांनी दिली तर प्रतिक उमरोटकर यांनी पोपटीच्या शेंगांची चवच भारी असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -