घररायगडप्रशासनाची दंड वसुली; सुविधांच्या नावाने बोंब!

प्रशासनाची दंड वसुली; सुविधांच्या नावाने बोंब!

Subscribe

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गांभीर्य प्रशासनाने फक्त दंड वसुलीपुरते घेतल्याचे चित्र पहावयास मिळत असून, वाढत्या कोरोना रुग्णासाठी येथे तातडीने किमान कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी होत आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गांभीर्य प्रशासनाने फक्त दंड वसुलीपुरते घेतल्याचे चित्र पहावयास मिळत असून, वाढत्या कोरोना रुग्णासाठी येथे तातडीने किमान कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी होत आहे. रविवारी खालापुरात 42 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. दुसर्‍या लाटेतील सर्वाधिक रुग्ण रविवारी सापडले. औद्योगिक तालुका अशी खालापूरची ओळख असून, जवळपास 280 कारखाने या ठिकाणी आहेत. त्यामुळे साहजिक देशाच्या कानाकोपर्‍यातून दररोज वाहतुकीची वर्दळ असते. या वर्दळीचा विपरित परिणाम कोरोना काळात अधिक जाणवत आहे. 20 दिवसांत कोरोन रुग्ण संख्येने तीनशेचा आकडा पार केला आहे. पहिल्या लाटेत देखील कोरोनाचा हॉटस्पॉट तालुक्याची ओळख झाली होती.

कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची हेळसांड, तसेच उपचारासाठी धावाधाव झाली होती. पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईत तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी साधे बेड आणि ऑक्सिजन बेड मिळणे मुश्कील झाले होते. गंभीर परिस्थिती ओढावल्यानंतर राजकीय नेते आणि जनतेच्या रेट्यामुळे खोपोली आणि येथे कोविड केंद्र सुरू झाले. परंतु तोपर्यंत खूप मोठी झळ सोसावी लागली. दुसर्‍या लाटेत दररोज कोरोना रुग्ण सापडत असताना देखील प्रशासन अद्याप आकडेवारी प्रसिद्ध करणे आणि दंड वसुलीत समाधान मानत आहे. कोविड केंद्र आणि ऑक्सिजन बेडच्या सोयींनी युक्त कोविड रुग्णालय उभारण्यासाठी अद्याप पावले उचलली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

नगर पंचायत, खोपोली नगर परिषद पोलिसांच्या मदतीने नागरिकांकडून दंड वसुली करीत असताना परिसर निर्जंतुकीकरण, घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम ही शासनाची जबाबदारी असल्याचा विसर पडला आहे. तालुक्यात लसीकरणाला हवा तसा वेग नसल्याने कमीत कमी कोरोना रुग्णांसाठी आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हा पातळीवरून आदेशाची वाट स्थानिक प्रशासन पहात असल्याची परिस्थिती आहे.

सध्या खालापुरात शासनाचे एकही कोविड रुग्णालय सुरू नाही. केवळ खासगी अंबानी रुग्णालयात आठ बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे चौक, खोपोलीसह रसायनी भागात कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

रुग्ण वाढीचा वेग

17 मार्च 2021
कोरोनाबाधित रुग्ण -3134

4 एप्रिल 2021
कोरोनाबाधित रुग्ण -3457

हेही वाचा –

यंदा भारतात ९८ टक्के मॉन्सूनचा अंदाज, कसा मोजला जातो पावसाचा अंदाज, काय आहेत मॉडेल्स ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -