घररायगडपाताळगंगा नदीतून पाणी चोरी; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाताळगंगा नदीतून पाणी चोरी; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Subscribe

पाताळगंगा नदीसह तिच्या जोडनद्यांतून चोरीचे प्रमाण वाढले असून याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पाताळगंगा नदीवर अनेक ठिकाणी मोटार पंप लाऊन पाणी परस्पर उचलले जाताना दिसत आहे.यात फार्महाऊसवाले यांचा भरणा जास्त आहे.हे पाणी उचलत असताना पाटबंधारे विभागाने रितसर परवानगी दिली की नाही?, अशी शंका व्यक्त होत आहे. पाताळगंगा नदी व मोरबे धरणाच्या खालच्या बाजूस असलेली धावरी नदी, कलोते धरणातून व भिलवले धरणातून बाहेर पडणार्‍या नदीतून पाणी उचलताना आढळत आहे.

चौक: पाताळगंगा नदीसह तिच्या जोडनद्यांतून चोरीचे प्रमाण वाढले असून याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पाताळगंगा नदीवर अनेक ठिकाणी मोटार पंप लाऊन पाणी परस्पर उचलले जाताना दिसत आहे.यात फार्महाऊसवाले यांचा भरणा जास्त आहे.हे पाणी उचलत असताना पाटबंधारे विभागाने रितसर परवानगी दिली की नाही?, अशी शंका व्यक्त होत आहे. पाताळगंगा नदी व मोरबे धरणाच्या खालच्या बाजूस असलेली धावरी नदी, कलोते धरणातून व भिलवले धरणातून बाहेर पडणार्‍या नदीतून पाणी उचलताना आढळत आहे.
शेती, फार्महाऊस, वीटभट्टी आणि अन्य व्यवसायासाठी पाणी उचलले जात आहे. अनेक धनाढ्य फार्महाऊसवाले परवानगीविना पाणी उचलत असतात. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून सरकारी नियमानुसार हे सारे घडते आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी डिझेल इंजिन लाऊन पाणी घेतले जाते,पण काही विद्युत पुरवठा घेऊन मग तो अधिकृत की विनापरवाना असतो, अशीही शंका व्यक्त केली जात असून हा प्रकार अतिशय धोकादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काही ठिकाणी आकडे टाकून पाणी चोरले जात आहे. जवळपास सर्व नदी काठच्या जमिनी धनाढ्य लोकांनी विकत घेतलेल्या आहेत,नदीकाठी स्थानिक शेतकरी असल्याने वीज आणि पाणी चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे.

… तर घरगुती वापरासाठी पाणी मिळणार नाही
काही फार्महाऊसवाले यांनी पक्क्या स्वरूपाचे बंधारे नदीवर बांधले आहेत,त्यामुळे पाणी त्याच ठिकाणी आडून राहिल्याने नदीचा प्रवाह बंद होऊन खालच्या भागातील शेतकरी पाण्यावाचून आपला व्यवसाय बंद करताना आढळत आहे. आता अनेक ठिकाणी वाहत्या पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे,त्यात येणारा प्रखर उन्हाळा याने पाण्याची गरज वाढणार आहे, नदीकाठी पाणी चोरीचे प्रमाण वाढले तर स्थानिकांनी घरगुती वापरासाठी देखील पाणी मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक जनता व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -